Friday, September 11, 2026
Homeनगरआ. डॉ. किरण लहामटे यांची कार व ट्रकची समोरासमोर धडक

आ. डॉ. किरण लहामटे यांची कार व ट्रकची समोरासमोर धडक

अकोले |प्रतिनीधी| Akole

अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamate) यांच्या फ़ॉर्च्युनर कार व ट्रक यांच्यात (Car and Truck Accident)  सोमवारी दुपारी विठे घाटात समोरासमोर अपघात झाला आहे. या अपघातात आमदार डॉ. लहामटे यांच्या फ़ॉर्च्युनर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आ.डॉ.किरण लहामटे व त्यांचे सहकारी हे या अपघातातून बालंबाल बचावले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार आ.डॉ. किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamate) हे अकोलेहून (Akole) राजूरकडे जात असताना विठे घाटात त्यांच्या फॉर्च्युनर कार (एमएच.17 डीएफ 9991) या वाहनास चुकीच्या बाजूने येणार्‍या ट्रक (एमएच-17 टी 8496) ची समोरासमोर धडक झाली. या अपघातातुन आमदार लहामटे बचावले असुन त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

आमदार लहामटे यांचे तालुक्यातील राजुर (Rajur) येथे निवासस्थान आहे. आज दुपारी अकोले येथुन ते राजुरला चालले होते. अकोल्यापासुन सुमारे दहा किमी अंतरावरील विठे घाटात त्यांच्या गाडीला समोरून चुकीच्या बाजूने येणार्‍या मालमोटारीने जोराची धडक दिली. या अपघातात डॉ. लहामटे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी त्यांच्या सह गाडीमधील सर्वजण बचावले. कोणालाही इजा झाली नाही.

ताज्या बातम्या

धक्कादायक! खर्डा येथे भरदिवसा कोयत्याने वार करून दूध व्यावसायिक चालकाची हत्या

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी जामखेड रस्त्यावरील जातेगाव फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास एका दूध वाहतूक चालकावर ३ ते ४ अनोळखी इसमांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला...