नांदुरी । सप्तशृंगी गड | वार्ताहर Saptshrungi Gad
महानवमीनिमित्त ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात श्रीभगवतीच्या कीर्ती ध्वजाची विधीवत पूजा करूनमिरवणूक काढण्यात आली. आज मध्यरात्री सप्तशृंगी गडावरील शिखरावर गवळी परिवाराच्या हस्ते देवीचा कीर्तीध्वज फडकविण्यात येणार आहे.
धुके अन् सर्वत्र पसरलेला गारवा अशा आल्हाददायक वातावरणात सप्तशृंगगडावर महानवमीला सुरुवात झाली. पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने श्री भगवतीची पंचामृत महापूजा संपन्न झाली. महानवमी निमित्त गाभार्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे गाभारा आकर्षक दिसत होता. नवमीला देखील भाविकांची अपेक्षेपेक्षा गर्दी कमीच जाणवली. सर्वत्र झालेल्या नुकसानकारक पावसामुळे भाविकांच्या गर्दीवर परिणाम झाला होता. याचा फटका देवस्थानावर आधारित सर्व व्यावसायिकांना बसला आहे. 1 रोजीची पंचामृत महापूजा जिल्हाधिकारी जलज शर्मा व श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त भूषणराज तळेकर यांनी सपत्नीक केली.
ट्रस्टच्या मुख्यकार्यालयातून अलंकरांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. श्रीभगवतीला पिवळ्या रंगाचे भरजरीचे महावस्त्र नेसविण्यात आले होते. यासह देवीचे अलंकार परिधान करण्यात आले. गाभार्याची सजावट देणगीदार भाविक वासुदेव सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात आली. महानवमीनिमित्त श्री भगवतीच्या शिखरावर कीर्तीध्वज फडकवणारे ध्वज मानकरी गवळी परिवारच्या हस्ते देवीची दुपारची महानैवेद्य आरती संपन्न झाली. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता ट्रस्टच्या मुख्यकार्यालयात विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री भगवतीच्या कीर्ती ध्वजाची विधीवत पूजा संपन्न झाली.
यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी महेश शेलार, तहसीलदार रोहिदास वारुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, विश्वस्त अॅड. ललित निकम, ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, महसूल मंडळ अधिकारी विलास पगार, ध्वजमानकरी एकनाथ गवळी, सोमनाथ गवळी, विष्णू गवळी, विनायक गवळी, दत्तू गवळी, रमेश गवळी, एकनाथ पंडित गवळी, सचिन गवळी, रघुनाथ गवळी, गौरव गवळी, सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदिप बेनके, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजय दुबे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे उपस्थित होते.
तत्पूर्वी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते श्री भगवती मंदिरातील सभामंडपात शतचंडी यागास सुरवात झाली. यावेळी परोहित घनश्याम दीक्षित, शेखर देशमुख, श्रीकांत दीक्षित, धनंजय दीक्षित, मिलिंद प्रमोद दीक्षित, मिलिंद राजेंद्र दीक्षित, गौरव देशमुख, प्रसाद दुर्गादास दीक्षित, भूषण देशमुख, तुषार देशमुख, भाग्येश दीक्षित, प्रसाद विनोद दीक्षित, सहा. मंदिर विभागप्रमुख विश्वनाथ बर्डे, पर्यवेक्षक सुनिल कासार आदि उपस्थित होते.




