Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजधुमाकुळ घालणारा बिबट्या जेरबंद

धुमाकुळ घालणारा बिबट्या जेरबंद

डांगसौंदाणे | वार्ताहर Dangsaundane

- Advertisement -

येथील वड्याचेपाडे शिवारात गेली अनेक दिवस धुमाकुळ घालणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात मध्यरात्री अडकल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

या भागात गेली अनेक दिवस शेतकर्‍यांना दिवसा दर्शन देणार्‍या या बिबट्यामुळे मोठे भितीचे वातावरण होते शेतकरी वर्ग एकटा शेतात जाण्यासाठी घाबरत होता याबाबत शेतकर्‍यांनी सटाणा वनविभागाकडे तक्रार केली होती. वनविभागाने पिंजरा लावला असता सावजाच्या शोधात आलेला हा बिबट्या पिंजर्‍यात अडकला.

सकाळी स्थानिक शेतकर्‍यांनाच्या लक्षात आल्याने याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने सकाळी तत्काळ बिबट्याला या ठिकाणाहून दुसरकिड हलविले बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केलं आहे.

ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय! ‘माजी अग्निवीरांना’ शासकीय नोकरीत १०% आरक्षण, वैरण...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक आज मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील युवक, शेतकरी,...