Wednesday, May 8, 2024
Homeजळगावबेपत्ता झालेला मुलगा जखमी अवस्थेत सापडला रेल्वेरुळावर

बेपत्ता झालेला मुलगा जखमी अवस्थेत सापडला रेल्वेरुळावर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

घरच्यांना दहा मिनिटात येतो असे सांगून घरातून (left home ) निघालेला चौदा वर्षीय तक्षील उर्फ लकी बळीराम साळुंके (Lucky Baliram Salunke) (रा. पंढरपूरनगर) हा मुलगा आशाबाबा नगरजवळ (Ashababa Nagar) रेल्वे रुळावर (railway track) जखमी अवस्थेत (injured state) आढळून आल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. मुलागा गंभीर अवस्थेत असल्यामुळे त्याची काहीही बोलण्याच्या मनस्थितीत (no mood to say anything) नसल्यामुळे घटनेचा उलगडा झालेला (Explanation of the incident) नाही. मात्र पोलिसांकडून घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांच्याकडून तपास केला जात आहे.

- Advertisement -

शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंढरपूर नगरात बळीराम साळुंखे हे वास्तव्यास असून ते भारत गॅस कंपनीत नोकरीला आहे. गुरुवारी दि. 13 रोजी तक्षील उर्फ लकी हा घरच्यांना दहा मिनिटात येतो असे सांगून तो सायकल घेवून घराबाहेर गेला. परंतु रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने लकीच्या आईने ड्युटीवर गेलेल्या त्याच्या वडीलांना याबाबतची माहिती दिली. दरम्यान, कुटुंबियांकडून रात्रभर संपुर्ण परिसरात तक्षीलचा शोध घेतला मात्र तो मिळून न आल्याने अखेर दुसर्‍यादिवशी सकाळीच त्यांनी तक्षील हरविल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बोलल्यानंतरच घटनेचा उलगडा

लकी उर्फ तक्षील याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी त्याची बोलून त्याचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्षील हा बोलण्याच्या स्थितीत नसून तो बोलल्यानंतर घटनेचा उलगडा होणार आहे.

घातपात झाल्याचा संशय?

एमआयडीसी परिसरात राहणारा तक्षील उर्फ लकी हा एकटाच मुंबाईकडे रेल्वे जात होता का, तो पिंप्राळा परिसरात कसा गेला?, घरातून सायकल घेवून गेल्याने घटनास्थळासह इतर ठिकाणी त्याची सायकल पोलिसांना मिळून आली नाही. दरम्यान, लकीचे अपहरण करुन त्याला जबरदस्तीने तर घेवून जात नव्हते ना, त्यांच्या तावडीतून त्याने आपली सुटका व्हावी म्हणून रेल्वेतून उडी तर मारली नसावी. तसेच लकीचे अपहरण करुन त्यावर हल्ला करुन त्याचा घातपात करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच पोलिसांकडून अशा विविध शक्यता पडताळल्या जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या