Thursday, May 2, 2024
Homeनगरअहमदनगर : ‘महिन्यां’ची अट शाळा सुरू करण्यास ठरतेय अडसर

अहमदनगर : ‘महिन्यां’ची अट शाळा सुरू करण्यास ठरतेय अडसर

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar – जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असून यामुळे राज्य सरकारने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, मागील महिनाभर संबंधीत गावात एकही करोना बाधित नसल्याच्या अटीमुळे शाळा सुरू करण्यास अडथळा ठरत असून गाव पातळीवरून शाळा सुरू करण्याचा ठराव आलेले नसल्याने माध्यमिक शिक्षण विभागाची अडचण झाली आहे.

राज्य सरकारने अडटींसह आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरण्यास पवानगी दिली आहे. यासाठी गावात सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यास सांगण्यात आले आहे. सरपंच यांच्या अध्यक्षतेखालील समिती पालकांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा ठराव करणार आहेत. त्यादृष्टीने माध्यमिक शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने गटशिक्षणाधिकारी यांना पत्र पाठविण्यात आले आहेत. तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या संबंधीत गावातील पालकांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा ठराव करणार आहेत. हा ठराव करण्यापूर्वी संबंधीत गाव हे एक महिना करोनामुक्त झालेले पाहिजे. हा ठराव आल्यानंतर जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेनंतर माध्यमिक शिक्षण विभाग संबंधीत गावात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देणार आहेत.

- Advertisement -

…………………

दरम्यान, अडचणी असल्यातरी त्यातून मार्ग काढून शाळा सुरू करण्यास शिक्षक संघटना तयार आहेत. मात्र, यासाठी राज्य सरकारने सहकार्य करून शाळा सॅनिटर करण्यासाठी निधी द्यावा, विद्यार्थ्यांना कोविड झाल्यास मुख्याध्यापक यांना जबाबदार धरून नयेत, ग्रामीण भागातून अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरू अशी मागणी होत आहे.

………………..

- Advertisment -

ताज्या बातम्या