नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पावसाळा (Rainy Season) सुरू झाला तरी पाहिजे तसा पाऊस (Rain) अद्याप नाशिकमध्ये (Nashik) पडलेला नाही. मात्र, दुसरीकडे साथीच्या रोगांनी डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने मनपा आरोग्य विभागाची (Municipal Health Department) डोकेदुखी वाढली आहे. आताच शहरात डेंग्यू रुग्णसंख्या दोनशे पार झाली आहे. त्या पाठोपाठ मलेरियाचेही तीन रुग्ण पॉझिटीव्ह मिळाल्याने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी मनपात तातडीची बैठक घेऊन त्वरित कारवाईचे आदेश दिले.
हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यातील नऊ धरणे कोरडी; पाणीसाठा ७.६८ टक्क्यांवर
शहरात डेंग्यूचा (Dengue) धोका वाढत असून मलेरिया विभागाकडून युद्ध पातळीवर उपाययोजना देखील सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान डेंग्यूची उत्पत्तीस्थाने निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेल्या तीन रहिवासी सोसायट्यांवर महापालिकेच्या मलेरिया विभागाने कारवाई करुन आठ हजार चारशे रुपयांचा दंड वसूल आहे. तर ८५ नागरिकांना नोटिसा दिल्या आहेत.
हे देखील वाचा : संपादकीय : २५ जून २०२४- जनतेची कामे झाली पाहिजेत
जानेवारी ते जून दरम्यान डेंग्यू रुग्णांचा आलेख चांगलाच वाढला असून, रूण संख्या १९८ वर पोहचली असून चालू महिन्यात रुग्णसंख्या थेट ९४ वर गेल्याचे धक्कादायक चित्र आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी जून महिन्यात डेंग्यू रुग्णसंख्या ३३ वर होती. यंदा, मात्र डेंग्यूने शहरात हैदोस घातल्याचे दिसत आहे. गतवर्षी जानेवारी ते जून दरम्यान १३० रुग्ण होते. तर आता जानेवारी ते जून या पंधरवड्यापर्यंत १९८ जण डेंग्यूने बाधीत झाले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : घरझडतीत दीड लाखांचा गुटखा जप्त
दरम्यान डेंग्यूवर प्रतिबंध घालण्यासाठी मलेरिया विभागाकडून धूर फवारणीसह डास उत्पत्ती स्थाने शोधून नष्ट केली जात आहे.यावर्षी शहरात डेंग्यूचा कहर पहायला मिळत असून जून महिन्यातच रुग्णांची संख्या तब्बल ९४ वर गेली आहे. त्यामुळे शहर डेंग्यूचे हॉटस्पॉट बनत आहे.डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांना नोटिसा दिली जात आहे. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी आपल्या परिसरात घराजवळ पाण्याचे डबके साचवू कुठेही पाणी साचवू देऊ नये, असे आवाहन मलेरिया विभागाने केले आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : खैरतस्कर ‘पुष्पा’ जेरबंद; वनविकास महामंडळाची कारवाई
यंदा पावसाळ्यापूर्वीच डेंग्यूच्या सणांची संख्या शंभरी पार गेल्याने पावसाळ्यात डेम्यू संणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या पाण्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचत आहे. परिसरातील नाल्यांमध्ये, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात डासांचे अड्डे तयार होत आहे. शहरात अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नसली तरी डेंग्यू रुप्नांची संख्या दोनशे पावर पोचली आहे. त्यामुळे मलेरिया विभाग सतर्क झाला आहे.
कूलर, फ्रीजमधील ट्रेमध्ये पाणी ठेवू नका
रहिवासी भागातील अपार्टमेंटमध्ये, घरातील गच्चीवर अडगळीला पडलेल्या वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे डेंग्यू डासाची उत्पत्ती होते. नागरिकांनी कूलरसह फ्रीजमधील ट्रेमध्ये पाणी असणार नाही. याची काळजी घ्यावी. डास उत्पत्ती प्रकरणी तीन सोसायटयावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी डेंग्यूची उत्पत्ती होणार नाही. याची काळजी घ्यावी.
डॉ. नितीन रावते, मलेरिया विभागप्रमुख
विभागप्रमुखांनी समन्वय ठेवून काम करावे
शहरात डेंग्यू रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी आज तातडीने डास नियंत्रण समितीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य विभाग, घनकचरा, नगररचना, बांधकाम, पाणी पुरवठा व उद्यान या सर्व विभागाच्या प्रमुखांना डेंग्यू प्रश्नी समन्वय ठेवून डेंग्यू नियंत्रणासाठी काम करण्याचे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्तांसह सर्व विभागांचे प्रमुख होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा