Friday, May 17, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात पॉझिटिव्हचा आकडा २८ हजार पार

जिल्ह्यात पॉझिटिव्हचा आकडा २८ हजार पार

नाशिक । Nashik

नाशिक शहरत तसेच जिल्हात करोनाचा उद्रेक सुरूच असून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 746 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आतापर्यंतचा आकडा 28 हजार 423 इतका झाला आहे. तर दुसरीकडे रूग्ण बरे होण्याचा वेग वाढला असून आज दिवसभरात 440 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात 746 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 493 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 19 हजार 83 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 213 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 6 हजार 935 झाला आहे. मालेगावत पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. दिवसभरात 37 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 2 हजार 204 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 201 झाला आहे. तर 24 तासात जिल्ह्यातील 440 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 23 हजार 365 वर पोहचला आहे.

करोनामुळे दिवसभरात 10 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 5 नाशिक शहरातील असून ग्रामिण भागातील 3, मालेगाव येथील 2 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 755 वर पोहचला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढला असून 24 तासात 1 हजार 50 रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरात 674, ग्रामिण व गृह विलगीकरण 307, मालेगाव 37, जिल्हा रूग्णालय 12, डॉ. पवार रूग्णालय 20 रूग्णांचा समाावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या