Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशअदानी पुन्हा अडचणीत? हिंडेनबर्गनंतर आणखी एका संस्थेचा गंभीर आरोप, शेअर्स कोसळले

अदानी पुन्हा अडचणीत? हिंडेनबर्गनंतर आणखी एका संस्थेचा गंभीर आरोप, शेअर्स कोसळले

मुंबई | Mumbai

हिंडेनबर्गनंतर (Hindenburg) आता ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (OCCRP) दिलेल्या ताज्या अहवालात अदानी समूहावर गंभीर आरोप केले आहेत. अदानी समूहाने गुपचूप स्वत:चे शेअर्स खरेदी करून शेअर मार्केटमध्ये (Share Market) लाखो डॉलर्सची गुंतवणूक केल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालामुळे अदानी पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याची शक्यता वर्तविली जात आहे…

- Advertisement -

ओसीसीआरपी या ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या माध्यम संस्थेने अदानी ग्रुपसंदर्भातील अहवाल आज प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये त्यांनी अदानी ग्रुपवर स्वत:चे शेअर खरेदी करुन ते शेअर बाजारामध्ये लाखो डॉलर्सने गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ओसीसीआरपीकडून करण्यात आलेल्या या आरोपाचा मोठा फटका अदानी ग्रुपला बसला आहे. आज शेअर मार्केट उघडताच अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले आहेत.

Video : तब्बल १३ वर्षांनंतर मुंडे बंधु-भगिनींचं एकत्रित रक्षाबंधन

ओसीसीआरपीने मॉरिशसमध्ये केलेल्या अदानी ग्रुपच्या व्यवहारांचा तपशील जाहीर करण्याचा दावाही केला आहे. या अहवालानंतर गुरुवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत असल्याचे दिसत आहे. अदानी ग्रुपने २०१३ ते २०१८ या काळात त्यांचे शेअर्स गुपचूप खरेदी केले होते. ओसीसीआरपीचा दावा आहे की त्यांनी मॉरिशस आणि अदानी समूहाच्या अंतर्गत ईमेलद्वारे केलेले व्यवहार पाहिले आहेत.

या अहवालात असे म्हटले आहे की, गुंतवणूकदारांनी परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी ग्रुपचे शेअर्स खरेदी आणि विक्री केल्याची किमान दोन प्रकरणे तपासात समोर आली आहेत. या प्रकरणांमध्ये गुंतवणूकदारांनी विदेशी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी ग्रुपचे शेअर्स खरेदी आणि विकले आहेत.

“इंडिया आघाडीला हरवणं कुणाच्या बापाला शक्य नाही”; संजय राऊतांचे भाजपला आव्हान

गुरुवारी ओसीसीआरपी अहवालात नासिर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग या दोन गुंतवणूकदारांची नावे समाविष्ट असल्याचे समोर आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, हे लोकं अदानी कुटुंबाचे दीर्घकाळ व्यवसाय भागीदार आहेत. ओसीसीआरपीने दावा केला आहे की, चांग आणि अहली यांनी गुंतवलेले पैसे अदानी कुटुंबाकडून आल्याचा कोणताही पुरावा नाही. परंतु अहवाल आणि कागदपत्रे स्पष्टपणे दर्शवतात की, अदानी समूहातील त्यांची गुंतवणूक अदानी कुटुंबाच्या समन्वयाने करण्यात आली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

रक्षाबंधनासाठी जाताना कारचं टायर फुटलं, गाडी धरणात कोसळली; मुलीचा बुडून मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या