Thursday, May 2, 2024
Homeजळगावपारोळा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीत 42 प्रकरणे निकाली

पारोळा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीत 42 प्रकरणे निकाली

पारोळा – Parola

येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालततिचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात दाखल असलेले 658 प्रकरणांपैकी 42 प्रकरणे निकाली काढण्यात येऊन 26 लाख 89 हजार 56 रुपये तडजोड रक्कम वसूल करण्यात आली.

- Advertisement -

यावेळी पॅनल प्रमुख तथा दिवाणी न्यायाधीश महाळणकर, न्यायाधीश एम.के पाटील हे होते तर पॅनल पंच म्हणून एडवोकेट एच आर शर्मा हे होते.

यावेळी दाखल दिवाणी 63 प्रकरने होती त्यात एक प्रकरण निकाली निघाले तर फौजदारी 140 प्रकरणांपैकी 20 प्रकरणे निकाली निघून सुमारे तीन लाख 61 हजार रुपये वसूल करण्यात आले तर दाखल पूर्व 455 प्रकरणांपैकी 51 प्रकरणे निकाली काढून त्याची 23 लाख 28 हजार रूपये रक्कम वसूल करण्यात आली.

याकामी वकील संघ व तालुका विधी सेवा समिती तसेच कार्यालयीन कर्मचारी सहाय्यक अधीक्षक पी वाय पाटील, वरिष्ठ सहाय्यक आर एम मुकुंदे, कनिष्ठ सहाय्यक पंकज महाजन, कनिष्ठ लिपिक आर एस वाघ, एच एस सोनवणे, एच् .सी. संन्यासी, कुमारी यु एस पुरानिक, के.के पाटील,वाय पी शिंदे, सी बी पवार,आर आर भोई यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या