Friday, May 3, 2024
Homeजळगाव‘गुलाबी पथक’ करत आहे कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न

‘गुलाबी पथक’ करत आहे कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न

जामनेर । प्रतिनिधी Jalgaon

जिल्हाधिकारी अभिजित राउत यांच्या आदेशानुसार जामनेर तहसील कार्यालयात जळगाव उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडभिसे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीच्या बैठकीचे आयोजन तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. आरोग्य विभाग, नगर परिषद, पंचायत समिती, पोलीस या सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थीतीत कोरोना रुग्णसंख्या वाढीबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

- Advertisement -

बैठकीनंतर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व मास्कची सक्ती करण्यासाठी मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी बचत गटांच्या महिलांच्या स्वईच्छेने गुलाबी पथक स्थापन करून विना मास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी हे गुलाबी पथक सहकार्य करणार आहे. जामनेर वाकी रोड परिसरात उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडभिसे यांनी रस्त्यावर उतरून विना मास्क नागरिकांवरील कार्यवाहीत सहभागी होऊन प्रशासनाला सूचना केल्या. यावेळी तहसीलदार अरुण शेवाळे, मुख्यधिकारी राहुल पाटील, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, धनके, दत्तू जोहारे, गजानन माळी, राहुल पाटील, अनुजा जैस्वाल, सुरेश पाटील, देशमुख यांच्या सह गुलाबी पथकातील बचत गटांच्या महिला यांचा दंडात्मक कार्यवाहीत सहभाग आहे.

सर्व खाजगी डॉक्टरांना त्यांच्या कोरोना सदृश्य लक्षणे असणार्‍या रुग्णांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परवानगी शिवाय लग्न व इतर समारंभ आयोजित करण्यात येणार नाही.

गावपातळीवर ग्रामसेवक यांनी कोरोनाबाबत जनजागृती बाबतचे बॅनर लावून मास्क न लावणार्‍यांकडून 500 रुपये दंड वसूल करण्याच्या व ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दुकानदार फेरीवाले यांची नियमित कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांना व्यववसायची परवानगी द्यावी.

ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक गर्दी झाल्यास पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच पुढील आदेश येईपर्यंत सर्व आठवडे बाजार व यात्रा बंद राहतील तसेच धारिवाल पॉलिटेक्निक कॉलेज पळासखेडा व जैन वसतिगृह जामनेर येथील कोव्हिड केयर सेंटरच्या इमारती तात्काळ ताब्यात घेण्यात येऊन रुग्णसंख्या वाढल्यास त्याचा वापर करण्यात येईल, असे प्रांताधिकारी यांनी सांगितले. बैठकीस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे, डॉ. हर्षल चांदा, मुख्याधिकारी नगरपालिका राहुल पाटील, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, पोलीस निरीक्षक राहुल खताड, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील हे उपस्तीत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या