Friday, May 3, 2024
Homeनाशिकचक्क काळी माती टाकून खड्डे बुजवले

चक्क काळी माती टाकून खड्डे बुजवले

पाटोदा | वार्ताहर Patoda

पाटोदा गटातील येवला लासलगावरोड ( Yeola- Lasalgaon Road )वगळता जवळपास सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. काही रस्त्यांची कामे प्रस्तावित असली तरी काहीं वरती खडी टाकली आहे, काहीं वरती मुरूम टाकला आहे, तर काही रस्ते अजून खडी-मुरमाच्या प्रतीक्षेत आहेत. रस्त्यांना डांबर कधी येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काही ठिकाणी तर चक्क काळी माती टाकून रस्ते बुजवले आहेत. त्यामुळे रस्ता दुरूस्तीची ही कोणती पद्धत, असा सवाल वाहनचालक, ग्रामस्थांनी केला आहे.

- Advertisement -

पाटोदा गटाचं गाव असल्याने राजकारणात तालुक्याचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे तालुक्यातील बडे नेते पाटोदा गटातून वा गणातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असतात. छगन भुजबळ बांधकाम मंत्री झाल्यानंतर सबंध तालुका भरातील रस्त्यांचे रूपडे पालटले. परंतु आठ दहा वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्यांचे पुन्हा काम मात्र झाले नाही. आज मितीस पाटोदा गटातील जवळपास शंभर टक्के रस्ते चाळन झाले आहेत.

यामध्ये कानडी – विखरणी रस्त्याचं काम सुरू झालं; खडी आणि मुरूम टाकला गेला परंतु डांबरा वाचून अडून पडला आहे. पाटोदा – जळगाव नेऊ ( Patoda Jalgaon- Neu Road) रस्त्याचे कामही डांबरा वाचून अडून पडले आहेत. कानडी पाटोदा शिव रस्त्याचे कामही अपूर्ण अवस्थेत आहे.

तर पाटोदा शिरसगाव रस्त्याचे केवळ काळी माती टाकून खड्डे बुजवण्यात आले आहेत. सुस्थितीत असणारा येवला लासलगाव रस्ता जरी पाटोदा पर्यंत व्यवस्थित असला तरी पाटोदा ते आंबेगाव या रस्त्याचीही हालत तशी पाहता बरी नाही. या ना त्या प्रकारे या सर्वच रस्त्यांची ठेकेदारांनी म्हणा किंवा राजकीय नेत्यांनी उद्घाटने करून ठेवले आहेत. त्यामुळे हे कामे कधी पूर्ण होणार, रस्त्यांना डांबर कधी मिळणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या