Friday, May 3, 2024
Homeनाशिकडांगसौंदाणे येथे उपबाजाराची निर्मिती

डांगसौंदाणे येथे उपबाजाराची निर्मिती

सटाणा । प्रतिनिधी Satana

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती (Satana Agricultural Produce Market Committee) अंतर्गत तालुक्यात लखमापूर (Lakhmapur) येथे खरेदी-विक्री केंद्रासह, डांगसौंदाणे (Dangsaundane) येथिल उपबाजार निर्मिती प्रक्रिया (Submarket creation process) अंतिम टप्प्यात असून शेतकरी बांधवांच्या सुविधेसाठी विविध उपाययोजना करण्यासाठी बाजार समिती कटीबध्द असल्याचे मत सभापती संजय देवरे यांनी येथे बोलतांना व्यक्त केले.

- Advertisement -

करोना (Corona) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या ऑनलाइन (Online) पद्धतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत माहिती देतांना सभापती देवरे बोलत होते. उपरोक्त विषयावर खासगी जागा खरेदीसाठी अतिरिक्त निधीची (Fund) गरज निर्माण होऊ नये, यासाठी शासकीय जमिन (Government land) उपलब्ध करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा सूरु असल्याचे त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.

बाजार समितीसाठी विद्युत पुरवठा (Power supply) करण्यासंदर्भात सोलर पॅनल (Solar panel) उभारण्यात येणार असून अशा वेगवेगळ्या उपक्रमातून बाजार समिती प्रशासनाचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सभापती देवरे यांनी सांगितले. यावेळी कृउबा उपबाजार निर्मिती प्रक्रियेला गती देण्यात यावी, आवारात लिलाव झालेले कांदे भरण्यासाठी असलेला दर निश्चित करण्यात यावा, शेतकर्‍यांच्या सोयीसाठी कंधाणे-चौंधाणे परिसरात पेट्रोल पंप (Petrol pump) सुरु करावा,

भुई काट्यावर वजन केल्यानंतर हमाल-मापारी यांनी वेळेत शेतमाल खाली करावा, जिल्ह्यातील इतर ठिकाणी असलेल्या बाजारभावाचे तुलनात्मक विश्लेशण करावे आदिंसह इतर विषयावर झालेल्या चर्चेत तालुक्यातील डांगसौंदाणे, कंधाणे, औंदाणे, निरपुर, पिपळदर, धांद्री, लखमापूर आदी गावांतील सभासदांनी सहभाग घेतला.

सभेत अध्यक्ष पदासाठी संचालक केशव मांडवडे यांनी मांडलेल्या सुचनेस जयप्रकाश सोनवणे यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपसभापती मधुकर देवरे, नरेंद्र आहिरे, प्रकाश देवरे, वेणूबाई माळी, मंगला सोनवणे, सरदारसिंग जाधव, प्रभाकर रौदळ, रत्नमाला सूर्यवंशी, संजय बिरारी, संजय सोनवणे, तुकाराम देशमुख, पंकज ठाकरे, सुनीता देवरे, श्रीधर कोठावदे, संदीप साळे आदी संचालक उपस्थित होते. सचिव भास्कर तांबे यांनी इतिवृत्त वाचन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या