अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आज मंगळवार 27 ते शुक्रवार 30 ऑगस्टपर्यतच्या चार दिवसात, नांदेड (Nanded) वगळता मराठवाडा, नगर (Ahmednagar), पुणे (Pune), सातारा (Satara), सांगली, कोल्हापूर (Kolhapur), सोलापूर (Solapur) या 13 जिल्ह्यात हळूहळू पावसाचा (Rain) जोर कमी होवून दुपारी 3 वाजेच्या कमाल तापमान वाढ व हळूहळू उन्हाची तापी वाढण्याची शक्यता जाणवते.
दरम्यान या 13 जिल्ह्यात दुपारनंतर सायंकाळी झालाच तर तुरळक ठिकाणी केवळ गडगडाटी स्वरूपातील मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे (Indian Meteorology Department) सेवानिवृत्त अधिकारी तथवा ज्येष्ठ हवामान तज्त माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यानच्या या चार दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ खांदेश तसेच नाशिक व नांदेड आदी जिल्ह्यात, सध्या सुरू असलेल्या पावसाचा (Rain) जोर कायम राहणार आहे.
कोकण (Kokan) व घाटमाथ्यावरील पावसाचे सातत्य पाहता रविवार 25 ऑगस्टपासून सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून होत असलेला जलविसर्ग असाच टिकून राहू शकतो. त्यामुळे संबंधित नद्यांच्या काठावर पूर-परिस्थितीची शक्यता ही कायम आहे. शनिवार 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंतच्या सहा दिवसात संपूर्ण विदर्भ, खांदेश, नाशिक (Nashik) व मुंबई (Mumbai) आदी 16 जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस जोर पकडण्याची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी स्पष्ट केले.