Thursday, May 2, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७८ टक्के; सध्या ‘इतक्या’ जणांवर उपचार...

जिल्ह्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७८ टक्के; सध्या ‘इतक्या’ जणांवर उपचार सुरू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ३५० करोनाबाधितांना (Corona Patients) डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ४४७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ३५ ने घट झाली आहे. तसेच आतापर्यंत ८ हजार ७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार (Dr. Anant Pawar) यांनी दिली आहे…

- Advertisement -

नाशिक ग्रामीणमध्ये (Nashik Rural) नाशिक २४, बागलाण १६, चांदवड ०५, देवळा ११, दिंडोरी १५, इगतपुरी २६, कळवण ०१, मालेगाव ०४, नांदगाव ०३, निफाड ४७, पेठ ०२, सिन्नर १४, सुरगाणा ०८, त्र्यंबकेश्वर ०१, येवला ०६ असे एकूण १८३ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत.

तसेच नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) क्षेत्रात २५०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ०७ तर जिल्ह्याबाहेरील ०७ रुग्ण असून असे एकूण ४४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १३ हजार ५४५ रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक ग्रामीणमध्ये आढळून आलेले बाधित रुग्ण

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ०२, बागलाण ०४, चांदवड ००, देवळा ०८, दिंडोरी ०१, इगतपुरी ००, कळवण ००, मालेगाव ०१, नांदगाव ००, निफाड ०४, पेठ ००, सिन्नर ००, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ००, येवला ०० असे एकूण २० पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.१७ टक्के, नाशिक शहरात ९८.१६ टक्के, मालेगावमध्ये (Malegaon) ९७.२० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.८० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७८ इतके आहे.

मृत्यू

नाशिक ग्रामीण ४ हजार २४२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार २२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या