Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्यासत्तेतील सहभागाची ‘बक्षिसी’

सत्तेतील सहभागाची ‘बक्षिसी’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात अलीकडे पक्षांतर्गत, बेडूक उड्या, बंडाळी, पन्नास खोके एकदम ओके हे शब्द प्रकर्षाने वापरले जात आहेत. यामागील कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट. या फुटीवरून अनेक मतमतांतरे दिसून आले. मात्र हे बंड आम्ही का केले? हे सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांनी खेचून आणलेल्या कोट्यवधीच्या निधीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व सहा आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली. पवारांनीही त्याची उतराई म्हणून निधीच्या स्वरुपातून या आमदारांना निधी स्वरुपात बक्षिसी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

अगोदर शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर नाशिक जिल्ह्यातील अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांसह सहा आमदारांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना साथ दिली.ही साथ मिळताच सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांवर उपमुख्यमंत्री पवार यांनी निधीची उधळण करत त्याची परतफेड केल्याचे आता मानले जात आहे.जिल्ह्यातील सर्व सहा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघासाठी प्रत्येकी 35 ते 40 कोटींचा निधी मिळाल्याचे सांगितले जात आहे.

बंडानंतर छगन भुजबळांसह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार यांनी अजित पवारांची साथ दिली.यात अगोदर तटस्थ राहिलेल्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी नंतर भूमिका बदलत सत्तेच्या बाजूच्या पारड्यात आपले वजन टाकले.त्याची बक्षिशी त्यांना निधीच्या माध्यमातून मिळाली आहे.आता राष्ट्रवादीच्या आमदारांकडून प्रत्येकी 35 ते 40 कोटींचा निधी मतदारसंघासाठी मिळाल्याचा दावा केला जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मतदारसंघांची दखल

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नातून दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे 173 कोटींचा निधी मंजूर झाल्याने मतदारसंघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातील विविध प्रस्तावित कामांची स्थगिती अखेर अजित पवार उपमुख्यमंत्री होताच उठली असून त्यासोबतच काही नव्याने विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी राज्यातील सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर निधीची कृपा झाली, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात 36 कोटी 44 लाख मंजूर झाले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 42 कोटींची विकासकामे मंजूर करून घेण्यात आमदार कोकाटे यांनाही यश आले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली दोन वर्षे करोनात गेल्याने अपेक्षित निधी मिळू शकला नव्हता. कोकाटे यांनी अजित पवार यांना पाठिंबा देत सरकारमध्ये सामील झाले. अधिवेशनात सिन्नरसाठी 42 कोटींचा निधी मिळाला आहे. नाशिकरोड-देवळाली मतदारसंघातील विकासकामासाठी 40 कोटी रुपयांचा निधी अधिवेशनात मंजूर झाल्याची माहिती देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी दिली.

आमदार अहिरे यांनी शरद पवार गटाची साथ सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या गटात त्या नुकत्याच दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मतदार संघातील विविध विकासकामांसाठी 40 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या