Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यासुदृढ पिढीसाठी बालरोगतज्ञांची भूमिका मोलाची : डॉ. पवार

सुदृढ पिढीसाठी बालरोगतज्ञांची भूमिका मोलाची : डॉ. पवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारताची संस्कृती(Culture of India) ही आपली वैश्विक ओळख असून भविष्यातील भारत घडविण्यासाठी सुदृढ व संस्कारी पिढी घडविणे आवश्यक असून ही पिढी घडविण्यामध्ये बालरोग तज्ञांची(Pediatricians) भूमिका मोलाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar)यांनी केले. त्या इंडियन अकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक(Indian Academy of Pediatrics) या बालरोगतज्ञांच्या संघटनेच्या महिला विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

- Advertisement -

यावेळी मंचावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्स वूमन विंगच्या अध्यक्षा डॉ. हिमाबिंदू सिंग, संयोजन समितीच्या सचिव व समन्वयक डॉ. संगीता लोढा (बाफना), इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्सचे अध्यक्ष डॉ. रमेश कुमार, वूमन्स विंगच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. स्वाती भावे, डॉ. एलिझाबेथ व डॉ. उपेंद्र किंजवडेकर हे मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या की, महिलांमध्ये गुणवत्ता असून देखील त्यांना समाजात म्हणाव्या तेवढ्या संधी मिळत नाहीत. त्यामुळेच केंद्र सरकारच्या पुढाकाराने महिलांसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. महिला सक्षमीकरण तसेच मुलीच्या शिक्षणासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत असून मुलगी शिकली तर संपूर्ण परिवार सक्षम होतो, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आपल्या स्वागतपर भाषणात कुलगुरू डॉ. माधुरी कानेटकर म्हणाल्या की, नाशिक ही शिक्षण आणि धर्म यांची भूमी आहे. या परिषदेत देशभरातून 200 हून अधिक महिला बालरोगतज्ञ सहभागी झाले असून या परिषदेमध्ये होणार्‍या विविध तज्ञाचे मार्गदर्शन, पेपर प्रेझेंटेशनमुळे ज्ञानाचे आदान प्रदान होऊन ज्ञानरूपी समृद्धी मिळवण्यास मदत होईल.

महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. हिमाबिंदू सिंग यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या परिषदेतील विचारमंथनानंतर एक कृती आराखडा सादर करण्यात येणार असून युनिसेफ सोबत गर्ल्स चाईल्ड, स्तनपान, कुमार मुले व मुली यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येईल. या परिषदेसाठी डॉ. सुमिता घोष, डॉ. विवेक सिंग, डॉ. सेबंती घोष, डॉ. हेमंत गंगोलीया, डॉ. अमोल पवार, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. केदार मालवतकर तसेच देशभरातून बालरोगतज्ञ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या