Friday, May 3, 2024
Homeनाशिकगॅस दुर्घटनेत एजन्सीची भूमिका संशयास्पद

गॅस दुर्घटनेत एजन्सीची भूमिका संशयास्पद

पेठ । प्रतिनिधी Peth

पेठ तालुक्यातील Peth Taluka म्हसगण जवळील जांभूळपाडा Jambhulpada येथे र्गस दुर्घटनेत Gas Accident एजन्सीची Gas Agency भूमिका संशयास्पद असून संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय विकास परिषदेच्या वतीने तहसीलदार संदीप भोसले यांना देण्यात आले.

- Advertisement -

घरगुती गॅसची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत एक बालकासह चार व्यक्ती गंभीर भाजल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेच्या दुसर्‍या दिवशीच एचपीगॅस कंपनीचे HP Gas सेल्स मॅनेजर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मात्र एचपी कंपनीचा लोगो लावून पेठ येथील श्रीराम गॅस एजन्सीच्या Shriram Gas Agency दुकानात सतत वावर करुन आपण कंपनीतर्फे नेमण्यात आलेले मॅकेनिकल असल्याचे भासवुन व गॅस दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण करण्याचा प्रकार गेल्या 5-6 वर्षापासुन एजन्सीच्या माध्यमातून सुरु होता.

दुर्घटना घडल्यानंतर आपणास कुठलेही देणेघेणे नाही. अशी भूमिका एजन्सीने घेतलेली आहे. त्यांमुळे संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विकास परिषदेचे Akhil Bhartiy Vikas Parishad तालुकाध्यक्ष गणेश गवळी, संपर्कप्रमुख राहुल मानभाव, योगेश भांगरे, विलास बागुल आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या