Friday, May 17, 2024
Homeनाशिकमाकपचे अर्थकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व

माकपचे अर्थकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व

नाशिक । रवींद्र केडिया | Nashik

राजकारणाच्या (Politics) पटलावर मोठ्या पक्षांच्या गदारोळात सत्ता स्थापनेत छोट्या पक्षांची भूमिका नेहमीच मोठी राहिलेली आहे. नाशिकलाही (nashik) त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणात लहान पक्षांना महत्त्व राहिलेले आहे. त्यात महत्त्वाचा पक्ष (Party) म्हणजे माकपा आहे. कामगार संघटनेच्या (Trade unions) लढ्यात सिटूच्या माध्यमातून कामगारांच्या न्याय सातत्याने समाजकार्याचा गाडा ओढताना त्याला राजकारणाचा कधीच स्पर्श न करणारा असा हा पक्ष आहे.

- Advertisement -

मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दोन ते तीन नगरसेवक (Corporator) सातत्याने महापालिकेवर (Municipal Corporation) निवडून (election) आलेले आहे. माकपा खर्‍या अर्थाने शेतकरी (farmers) व कष्टकर्‍यांचा पक्ष आहे. कामगार (workers) वर्गात सिटू या कामगार संघटनेवर मोठा विश्वास आहे. मात्र त्याचे पर्यवसन निवडणुकीच्या मतदानात होत नसल्याचे दिसून येते. याला कारणेही अनेक आहेत.

सद्या निवडणुका या साम, दाम, दंड, भेद या तत्वांंचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात प्रामुख्याने मतदारांसाठी व कार्यकर्त्यांसाठी पार्ट्या, मदीरा वाटप (Alcohol distribution) व शेवटी पैशांचा वाटप (Allocation of money) वारेमाप प्रमाणात होत असतो. त्यामुळे मतदानाच्या दिवसापर्यंत मतदारांची पक्षनिष्ठा मतदानाच्या दिवशी गुंडाळून नेण्याचे काम धनदांडगे करीत असतात. हा मोठा रोग लोकशाहीला (Democracy) लागलेला आहे.

मात्र माकपा अथवा सिटू यांची तत्व वेगळी आहेत. मतांसाठी पैसे देणार नाही. कामासाठी पैसे घेणार नाही हे ब्रिद वाक्य प्रत्येक केडरच्या मनात ठामपणे रुजवले जाते. त्यामुळे मतदारांना लागलेल्या वाईट सवयींच्या चक्रात उमेदवार नेहमीच मागे पडत आला आहे. त्याउपरही कामाच्या बळावर आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीत माकपा उमेदवार काही प्रमाणात विजय मिळवत आलेले आहेत.

प्रत्यक्षात नाशिक औद्योगिक क्षेत्रातील (Nashik Industrial sector) बहुतांश कारखान्यांमध्ये सिटूची कामगार संघटना कार्यरत आहे. या माध्यमातून लाखो कामगार संघटनेशी जोडलेले आहे. मात्र मतदानाच्या वेळी त्यांच्या संघटना व पक्ष निष्ठा बदलून जात असल्याने निवडणूका नेहमीच अडचणीच्या ठरत आहे.

मात्र निवडणुकीत विजयी उमेदवाराची दमछाक करण्याची क्षमता पक्षाच्या उमेदवारांमध्ये दिसून आलेली आहे. येणार्‍या काळात मनपा निवडणुकीतच्या वॉर्ड रचना पाहुन उमेदवारांची निवड करण्यात येणार असून इच्छुकांची संख्यादेखील मोठी असल्याने याबाबत विचारपूर्वक उमेदवारी करण्याचा मनोदय पक्षांने व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या