Friday, May 3, 2024
Homeजळगावमहामंडळाच्या कर्मचार्‍यांचा संप अन् विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा संप अन् विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शिंदी, ता.भुसावळ । Bhusawal

ग्रामीण भागासह (Rural areas) शहरी भागातील शाळा (School) सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना (Student) शाळेत जाण्यासाठी नियोजनानुसार वेळेवर बसेस सोडण्याची मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालक वर्गातून केली जात आहे. परिवहन महामंडळाच्या (Transport Corporation) कर्मचार्‍यांचा त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संप सुरू असल्याने विद्यार्थ्यांना मात्र अपडाऊन करण्यासाठी अडचणी येत असून बसेस (ST buses) सुरु झाल्याशिवाय त्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही, यासाठी राज्य सरकारने संप मिटवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी सामान्य गोरगरीब पालक वर्गातून करण्यात येत आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यात शाळेत जाण्याची लगबग दिसून येत आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी एसटी बसेस ने शहराकडे येत असल्याने किंवा ग्रामीण भागात एका गावावरून दुसर्‍या गावी शाळेत जाण्यासाठी एसटी बसेस असा पर्याय निवडत असल्याने विद्यार्थी हितासाठी मागणीनुसार एसटी बसेस सुरू करणे गरजेचे आहे. मात्र परिवहन महामंडळ नियोजनानुसार बसेस उपलब्ध करून देत नसल्याने विद्यार्थ्यांना पायी जाणे, सायकल वापरणे किंवा रिक्षाचा आधार घेणे अशा पद्धतीने शाळेत ये-जा करावी लागत आहे.

(Online education) ऑनलाईन शिक्षणासाठी अगोदरच पायाभूत सोयी उपलब्ध नसल्याने तसेच बहुसंख्य पालक वर्गाची तशी परिस्थिती नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचा गवगवा झाला असला तरी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिल्याचे पालक वर्गातून सांगण्यात आले. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्याने त्यांना कुठेतरी दिलासा मिळत असल्याने शाळेत वेळेवर जाण्यासाठी बसेस उपलब्ध होणे गरजेचे आहे.

राज्य शासनाने (State government) एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा संप योग्य तोडगा काढून मिटवावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक परिषदेचे नाशिक विभागीय पदाधिकारी एस.एस. अहिरे व जळगाव जिल्हाध्यक्ष गिरीश एस. नेमाडे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या