Sunday, May 19, 2024
Homeजळगावविद्यार्थिनींनी रोड रोमिओला चोपले

विद्यार्थिनींनी रोड रोमिओला चोपले

बोदवड – प्रतिनिधी Bodwad

तालुक्यातील येवती येथील शालेय विद्यार्थिनी (Student) रोज जामठी येथे दोन कि.मी.पायी शाळेत (school) जात जातात, या दरम्यान बेटावद खु.येथील तरुण बापू दुमाले हा मुलींना रोज त्रास द्यायचा, छेडखाणी करायचा याबाबत विद्यार्थिनींनी शाळेत तक्रार दिली पण तो मुलगा शाळेतील नसल्यामुळे सरांनी व मुलींनी हा प्रकार पालकांना सांगितला.

- Advertisement -

नेहमी प्रमाणे आजही सकाळी पावणेसात वाजता तो मुलगा मुलिंजवळ येताच सर्व पालकांनी व विद्यार्थिनींनी सापळा रचून त्याला चोप दिला. व शाळेत हजर करून त्याला समज दिली, जेणे करून इतरांना सुध्दा चपराक मिळेल, नंतर त्यांला रितसर (police) पोलिसांच्या स्वाधीन केला.

(College) महाविद्यालयातील व शालेय विद्यार्थिनींच्या छेडखाणीच्या घटनांना पायबंद करायचा असेल तर दामिनी पथक लवकरात लवकर स्थापन करण्याची आवश्यकता आहे,अशी भावना यावेळी पालकांनी व्यक्त केली.मुलींच्या ट्युशनच्या वेळा कॉलेज, शाळांच्या वेळा एसटी महामंडळाचा संप चालू असल्यामुळे अवैध वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने वाहन वेळत मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे मुली बस स्थानकाच्या परिसरात वाहनांची वाट बघत थांबतात असतात. त्याचाच फायदा घेत रोडरोमियो दुचाकीवरून डबल सीट टीबल सीट वेडी वाकडी वाहने चालवतात हातवारे करतात.

यांचा बंदोबस्त दामिनी पथकाची (Damini squad) स्थापना केल्या शिवाय होऊच शकत नाही त्यामुळे बोदवड (police) पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर दामिनी पथक स्थापन करून रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा त्यामुळे ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी येतील व त्यांचे आई वडील निसंकोच राहतील यासाठी दामिनी पथक स्थापन करून रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा अशी पालक वर्गातून मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या