जुने नाशिक | प्रतिनिधी Nashik
शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाण असलेल्या द्वारका परिसरात आज (दि. 14) बर्निंग ओमनी कारचा थरार पाहायला मिळाला.
ओमनी कारने पेट घेताच द्वारका परिसरात मोठी खळबळ उडाली. पेटलेली कार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
अनिल जाधव नामक व्यक्तीचे इलेक्ट्रिकल वस्तूंचे दुकान आहे. आज त्यांनी लेखानगर येथून काही सामान घेऊन ते आपल्या आडगाव नाक्याकडे जात असताना त्यांच्या मालकीच्या व्हाईट रंगाच्या मारुती ओमनीने द्वारका चौकात आल्यावर अचानक पेट घेतला. सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
नागरिकांनी त्यांना सांगितले की तुमच्या वाहनाच्या खाली आग लागली आहे. म्हणून जाधव यांनी खाली उतरून पाहिल्यावर आग लागली होती, स्थानिक नागरिक तसेच रिक्षा चालक शब्बीर शेख यांचेसह इतरांनी त्वरित मदत कार्य सुरुवात केले व आग आटोक्यात आणली.