Friday, May 3, 2024
Homeक्रीडाआज रंगणार राष्ट्रीय दुचाकी रॅलीचा थरार

आज रंगणार राष्ट्रीय दुचाकी रॅलीचा थरार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

त्र्यंबकेश्वर(Trimbakeshwar ) नगरीपासून काही अंतरावर असलेल्या आंबोली ते हरसूल ( Aamboli to Harsul )जवळच्या गावांमध्ये रविवारी सकाळी राष्ट्रीय दुचाकी रॅलीचा ( National Bike Rally)थरार रंगणार आहे.काल स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन अंबोली विकेंड होमचे संचालक महेंद्र बच्छाव यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच हे देखील उपस्थित होते.

- Advertisement -

शनिवारी सकाळी रवींद्र वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेतील सहभागी 48 वाहनांची स्पर्धापूर्व तपासणी व कागदपत्रांची छाननी अमर गायकवाड, मिलिंद जोशी व सुधीर जोशी यांनी केली.त्यानंतर सर्व स्पर्धकांना रॅलीचा मार्ग दाखवण्यात आला. महेंद्र बच्छाव ग्रुपच्या अंबोली विकेंड होम येथून रविवारी सकाळी 8:31 वा. मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार आहे . या स्पर्धेत एकूण 144 किलोमीटर चा मार्ग असून त्यापैकी 53 किलोमीटर हा स्पर्धात्मक असणार आहे .

ग्रामीण भागातील अत्यंत अवघड अशा रस्त्यावरून हि स्पर्धा जाणार आहे.या मार्गावर आपली कसब दाखवताना स्पर्धकांनी चांगलीच दमछाक होणार आहे.

नाशिकच्या एडब्लयू इव्हेट्सच्या वतिने यंदाच्या हंगामातील शेवटच्या दोन फेर्‍यांपैकी मायभूमीत आणखी एक राष्ट्रीय अजिंक्यपदाची फेरी आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. एफएमएससीआयच्या मान्यतेने एमआरएफ मोग्रीप,टीव्हीएस अपाचे आरटीआर,गॉडस्पीड रेसिंग, आनंद बच्छाव ग्रुपच्या आंबोली विकेंड होम आणि गोदा श्रद्धा फौंडेशन या प्रायोजकांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.वेगवेगळ्या 11 गटात रॅली रंगणार आहे. याही हंगामात महिलांचा स्वतंत्र गट सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये दोन महिलांनी आपला सहभाग नोंदवला आहे . तर विविध गटांमध्ये विक्रमी अशा 48 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

स्कूटर गटात स्पर्धकांचा मोठा दबदबा असून यंदाच्या हंगामाचा आघाडीवीर नाशिकचा शमीम खान -पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग आणि द्वितीय स्थानावर असलेला एप्रिलिया जेबी रेसिंग चा पिंकेश ठक्कर कशा पद्धतीने टक्कर देतात हे बघणे रंजक ठरेल. महिला गटात टीव्हीएस रेसिंगच्या पी.एम.ऐश्वर्याने ओळीत तिनही फेर्‍या जिंकल्याने तिच्या मार्गात फारसा अडसर नसेल. स्पर्धेत एकुणच पेट्रोनास टीव्हीएस विरुद्ध एप्रिलिया जेबी रेसिंग स्पर्धकांमध्ये स्कूटर गटातील मुकाबला रंगतदार ठरणार आहे.

स्पर्धेदरम्यान कोणाला तातडीची वैद्यकीय मदत लागल्यास त्याकरिता तीन सुसज्ज रूग्णवाहिका तयार ठेवण्यात येणार आहे, त्यातील एका रूग्णवाहिकेत ट्रॉमा केअर यूनिट सज्ज असेल. स्पर्धेच्या दळणवळणाच्या व संचालनाच्या दृष्टीने रेडियो संपर्क यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे अशी माहिती रॅली चे क्लार्क ऑफ कोर्स तथा ए डब्लू इव्हेंट्स चे संस्थापक अमित वाघचौरे यांनी दिली आहे.

स्पर्धात्मक मार्ग

त्र्यंबकेश्वर आणि हरसूलच्या दरम्यान नांदगाव कोळी -खरवळ फाटा – हेदुलीपाडा- नांदगाव कोळी- वरसविहीर खरवळ आणि खरवळचा फणस पाडा फाटा- वीरनगर -आडगाव- देवळा फाटा यादरम्यान असणार आहे. नंतर हे स्पर्धक हरसुल – वाघेरा घाट मार्गे – अंबोली विकेंड होम येथे सर्विस साठी येतील. अशा पद्धतीने हा मार्ग स्पर्धक 3 वेळा पार पाडणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या