Friday, May 3, 2024
Homeनाशिकसीबीएसईचे कामकाज 'या' पोर्टल द्वारे होणार

सीबीएसईचे कामकाज ‘या’ पोर्टल द्वारे होणार

नाशिक | Nashik

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बाेर्डाने आयटी तंत्रज्ञानाचा वापर करून कागदविरहित कामकाज करण्यावर भर दिला आहे.

- Advertisement -

यासाठी नव्याने ‘ई-हरकरा’ पाेर्टल विकसित केले आहे. त्यामुळे आता १ सप्टेंबरपासून सीबीेएसई संलग्न शाळांना या पाेर्टलवरूनच प्रशासकिय कामकाज करावे लागणार आहे.

पारदर्शकता व लेखा परीक्षण ठेवण्यासाठी सीबीएसईने परीक्षा, शैक्षणिक विभाग इत्यादीमध्ये आयटी प्रणाली विकसित करून कार्यान्वित केल्या आहेत.

या पोर्टलच्या माध्यमातून सर्व संलग्न शाळा सीबीएसईशी संबंधित सर्व बाबींविषयी विनंती, सूचना, तक्रारी, सल्ले, निवेदने थेट त्या-त्या युनिट अधिकार्‍यांना त्यांच्या लॉगइनद्वारे सबमिट करू शकणार आहे. आताही बर्‍याच शाळा ई-हरकाराच्या सेवेचा उपयोग सध्या करत आहेत. परंतु, काही शाळा सीबीएसईकडे संपर्कासाठी अद्याप कागदाने किंवा ई-मेल वर संपर्क करत आहेत. यापुढे सर्व शाळांनी ई-हरकरा पोर्टलमार्फतच त्यांच्या विनंती व कामकाज पाठवावे असा निर्णय घेण्यात आला आहे.

याबद्दल सर्व शाळांनी सहकार्य वाढवावे, अशी विनंतीही सीबीएसईने केली असून १ सप्टेंबर, २०२० नंतर संबंधित शाळांकडून कागदावर आणि मेलवर आलेल्या कोणताही सूचनेला उत्तर दिले जाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. याबाबतच्या परिपत्रकासह एसओपीदेखील शाळांना पाठविण्यात अाली आहे, अशी माहिती सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी दिली आहे.

देशातील सर्व शाळांना प्रशासकीय कामकाजासाठी या पोर्टलचा वापर करणे अनिवार्य असून शैक्षणिक कामकाज सीबीएसईने यापूर्वीच ऑनलाइन केले आहे. त्यानंतर देखील शाळांकडून निवेदने आणि तक्रारी कागदावर किंवा ई-मेलद्वारे पाठविल्या जात आहेत. त्यामुळे हे कामकाज पूर्णत: कागदविरहित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. शाळा आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून या पोर्टलचा प्रभावी वापर करू शकणार आहेत.

सीबीएसईकडे विविध शाळांकडून संबंधित विभागाला वारंवार पत्र पाठवून पाठपुरावा करूनही योग्य ती पावले उचलली जात नाहीत, अशा तक्रारी शाळांकडून सातत्याने केल्या जातात. मात्र यापूर्वी शाळा प्रत्यक्ष कागदावर किंवा ई-मेलचा वापर करून निवेदन पाठवत असे. याद्वारे पाठविलेले निवेदन संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोचत नसल्याची शक्यता आहे.

परिणामी शाळांची निवेदने धूळखात पडून राहतात. मात्र आता या पोर्टलद्वारे शाळांचे निवेदन थेट संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोचू शकणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या