Friday, May 3, 2024
Homeजळगावशिक्षकांचेे कार्य अतुलनीय-शिवाजीराव पाटील

शिक्षकांचेे कार्य अतुलनीय-शिवाजीराव पाटील

चाळीसगाव Chailsgaon प्रतिनिधी

शिक्षक हा भविष्याचा निर्माता असून वर्गाच्या चार भिंतीच्या आत केल्या जाणार्या पेरणीतून उद्याचा समाज व राष्ट्र उभे राहत असते. त्यामुळे त्याने केलेली पेरणी हेच राष्ट्राचे खरे भविष्य असते. स्वप्न महासत्तेचे असू दे नाही तर प्रगत राष्ट्राचे, ते पूर्ण करण्याचा मार्ग शिक्षकांच्या स्वप्नातूनच जातो असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजीराव पाटील (Shivajirao Patil) यांनी केले.

- Advertisement -

Visual Story भोजपुरीतील प्रसिध्द अभिनेत्री ४६५ वेळा बनली वधू

शिक्षक दिनाच्या औचित्यपर रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव यांच्या वतीने काल दिनांक ११ सप्टेंबर रोजी रोटरी हॉल येथे तालुक्यातील २८ गुणवंत शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रविण बागड, सचिव अनिल मालपुरे, प्रकल्प प्रमुख प्रा.डॉ.रवींद्र निकम, स्वप्नील कोतकर उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक शिक्षकासाठी विद्यार्थी ही मोठी श्रीमंती असून विद्यार्थ्यांवर केले जाणारे संस्कार, त्यांच्या मस्तकात पेरली जाणारी स्वप्ने ही राष्ट्रसेवेइतकीच महत्वाची आहेत. एक शिक्षक अनेकांचे आयुष्य समृध्द करीत असतो. त्या समृध्दतेचा प्रवास हा सर्वांसाठी महत्वाचा आहे. शिक्षकांना युवाशक्ती घडवायची आहे. ती युवा शक्तीच पृथ्वीतलावरची मोठी शक्ती आहे. ती शक्ती कोणत्या विचाराने घडविली जाते हे शिक्षकच जाणू शकतात. युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती आणि त्यांची जडणघडण हीच राष्ट्रभक्ती आहे. त्यांच्या मनात होणारी पेरणीच उद्याचे राष्ट्र घडविणारे असते.

शिक्षकी पेशा म्हणजे केवळ सरकारी नोकरी नसून राष्ट्रनिर्मितीचे काम आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही समाजसेवेपेक्षा या पेशातील प्रामाणिकपणाने केलेले काम ही राष्ट्राची सर्वोत्तम व उत्तम समाजसेवा आहे. शिक्षक जे पेरतात ते भविष्यात उगवत असते. राष्ट्राला लागणारे उत्तम मनुष्यबळ हे शिक्षणातून पेरले जात असते. धर्मसत्ता, राजसत्ता येत जात रहाते परंतु खर्‍या अर्थाने शिक्षक हे ज्ञानसत्तेचे पाईक राहिले आहेत असे मत रोटरी क्लबचे माजी सहाय्यक प्रांतपाल डॉ सुनील राजपूत यांनी यावेळी व्यक्त केले.

असे आहेत पुरस्काराचे मानकारी –

सोनाली पवार (एच.एच.पटेल), सुनील पाटील (एच.एच.पटेल), शुभांगी सोनवणे जि.प.न्हावे), राजेंद्र पाटील (जि.प.पाटणा), चंद्रमणी पगारे (जि.प.बोढरे), राजेश माने (राष्ट्रीय विद्यालय), कल्पना भोई (राष्ट्रीय विद्यालय), वैभव खैरनार ( मा.वि. जामदा), समाधान बच्छाव (आ.बं.हायस्कूल), सुनीता कासार (आ.बं.हायस्कूल), दिलीप परदेशी (एस.सी.नवबौद्ध निवासी शाळा), प्रिया पाटील (एस.डी.झाल्टे विद्यालय), रवींद्र पाटील (अभिनव विद्यालय), रविकिरण पाटील (अभिनव विद्यालय), प्रशांत चव्हाण (जि.प.तांदूळवाडी), शेख अनिस शेख हबीब (तहजीब उर्दू हायस्कूल), सुनील पाटील (विवेकानंद हायस्कूल), श्रावण महाजन (जयहिंद विद्यालय), युवराज पाटील (मा.वि.ब्राह्मणशेवगे), सविता वाघ (जि.प.शिंदी), सुधीर पाटील (मा.वि.पाटखडकी), हिलाल बोरसे (न्यू इंग्लिश स्कुल शिरसगाव), संयोगिता शुक्ल (जि. प.बोरखेडे), प्रकाश पाटील (पी.एस.पाटील विद्यालय,भामरे), घनशाम वराडे (वाय.डी.पाटील विद्यालय तांदुळवाडी), सिद्धार्थ सोनवणे (डॉ.आंबेडकर विद्यालय), दिपाली पाटील (सी.आर.कळंत्री विद्यालय), संगीता मोराणकर (सी.आर.कळंत्री विद्यालय) या गुणवंत शिक्षकांना यावेळी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कारार्थी शिक्षकांमधून राजेश माने, समाधान बच्छाव, दिपाली पाटील यांनी आपल्या मनोगतातून आजची शिक्षण व कार्यपद्धतीवर प्रकाशझोत टाकला तर प्रविण बागड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.उज्वला देवरे, किरण देशमुख, बलदेव पुंशी, शशिकांत धामणे, हिम्मत पटेल, राजेंद्र अमृतकर, पुजा मालपुरे, शुभांगी बागड, गणेश बागड, चंद्रेश लोढाया, विवेक येवले, रवींद्र शिरुडे, विनोद बोरा, संजय अग्रावत, किशोर गवळी, अक्षय बागड आदी रोटेरियन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख प्रा.डॉ.रवींद्र निकम यांनी केले, सूत्रसंचालन ब्रिजेश पाटील यांनी केले, तर आभार सचिव अनिल मालपुरे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या