Monday, April 28, 2025
Homeक्राईमकुस्तीपटुची धारदार शस्राने वार करत अज्ञातांनी केली हत्या

कुस्तीपटुची धारदार शस्राने वार करत अज्ञातांनी केली हत्या

इगतपुरी | प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यावर ऐन अक्षय्य तृतीयाच्या दिवशीच हत्या झाल्याची घटना घडली आहे. नाशिक – मुंबई आग्रा महामार्गावर राजूर फाटा येथे ही घटना घडली आहे. भुषण लहामगे असे इसमाचे नाव असून जिल्हास्तरीय कुस्तीपटू असल्याचे वृत्त आहे.

दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी या इसमावर सुरवातीला तीन ते चार राऊंड फायर केले त्यानंतर त्यांनी यावर न थांबता धारदार कोयत्याने ही सपासप वार केले. यानंतर, हे हल्लेखोर फरार झाल्याचे समजत आहे.

- Advertisement -

दरम्यान, वाडीवऱ्हे आणि ग्रामीण पोलीस दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा करून अज्ञात हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. भर महामार्गावर खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून मारेकऱ्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...