Tuesday, March 25, 2025
Homeमनोरंजनतैमूरसोबत लग्न करण्याची ‘या’ अभिनेत्रीची इच्छा

तैमूरसोबत लग्न करण्याची ‘या’ अभिनेत्रीची इच्छा

मुंबई – Mumbai

अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच तिच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या शोच्या माध्यमातून कायम वेग-वेगळ्या अभिनेत्रींसोबत गप्पा मारत असते. शिवाय त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न देखील विचारत असते.

- Advertisement -

प्रश्न-उत्तरांच्या या खेळात अभिनेत्रींच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे करीना तिच्या शोच्या माध्यमातून करत असते. नुकताच तिच्या शोमध्ये अभिनेत्री नोरा फतेहीने हजेरी लावली होती. या शो दरम्यान नोराने तैमुर अली खानसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमुर अली खान सोबत लग्न करण्याची नोराची इच्छा आहे. शिवाय तैमूरसोबत लग्न करण्यासाठी तिची प्रतिक्षा करण्याची देखील तयारी आहे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला करीनाने नोराला सांगितले की, मला आणि सैफला तुझा डान्स फार आवडतो. त्यानंतर नोरा म्हणाली, ‘तैमूर लवकर मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा मी त्याच्यासेबत साखरपुडा आणि लग्न करू शकते.’ नोराच्या या वक्तव्यावर करीनाला हसू आवरलं नाही.

सांगायचं झालं तर, तैमूर हा प्रसिद्ध स्टारकिडच्या यादीतील एक आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठा आहे. शिवाय त्याचे नवीन फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चाहते आतूर आसतात. तैमूर हा करीना आणि सैफचा पहिला मुलगा आहे. तर करीना लवकरच त्यांच्या दुसर्‍या बाळाला जन्म देणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....