Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : चोरी, घरफोडी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

Crime News : चोरी, घरफोडी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी व चोरीचे सत्र सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने एका टोळीचा पर्दाफाश करत चार सराईत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख 84 हजार 750 रूपये किमतीचे 33.7 ग्रॅमचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. अहिल्यानगर तालुका, सुपा, मिरजगाव आणि श्रीगोंदा येथील एकूण पाच गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -

23 फेब्रुवारी 2025 रोजी जयंत महादु केदार (वय 65, रा. निमगाव वाघा, ता. अहिल्यानगर) यांच्या घरी घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्री घरात घुसून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या घटनेप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपासाचे आदेश दिले होते. यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनील मालणकर, प्रशांत राठोड आणि अरूण मोरे यांचा समावेश होता. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पथकाला मिळालेल्या माहितीवरून चंद्या पिंपळा भोसले (वय 47, रा. घोसपुरी, ता. अहिल्यानगर) हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

YouTube video player

तो आपल्या साथीदारांसह अरणगाव (ता. अहिल्यानगर) येथील रेल्वे पटरीजवळ थांबला असल्याची माहिती मिळताच पथकाने तत्काळ सापळा रचून चंद्या भोसले, राकेश चंद्या भोसले (वय 21, रा. घोसपुरी), अर्जुन संभाजी काळे (वय 20), गोपीचंद चंदू काळे (वय 19, दोघे रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांनी शकल्या सुरेश भोसले, सफ्या रूस्तम चव्हाण (दोघे, रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी), रोहित चाचा भोसले (रा. सय्यदमीर लोणी, ता. आष्टी) यांच्यासोबत गुन्हा केल्याचे सांगितले. मात्र, ते तिघे पसार झाले आहेत. सदर आरोपींना पुढील तपासकामी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...