Thursday, May 2, 2024
Homeजळगावचाळीसगाव येथे कापड दुकानात चोरी

चाळीसगाव येथे कापड दुकानात चोरी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील रेल्वे स्टेशन (Railway station) रोडवरील शंकर गारमेंटस या रेडीमेड कापड दुकानात ठेवलेली लाख रुपयांची रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शंकर गारमेंटस् दुकानाचे (Garment shop) मालक राजेंद्र शंकरराव वाघ यांनी शहर पोलीसांत तक्रार दिली आहे.

- Advertisement -

या तक्रारीत दुकानातील तिजोरीत दोन दिवस झालेल्या कापड विक्रीतील रोख रक्कम ही मोजून दुकानातच ठेवलेली होती. दिनांक ३१ ऑक्टोबरच्या संकाळी नेहमी प्रमाणे दुकान उघडले असता दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा छताचा पत्रा उचकवून दुकानात प्रवेश करुन कपडे अस्ताव्यस्थ फेकून तिजोरीच्या लाकडी कपाटातून रोख रक्कम चोरुन नेली आहे. यावरुन चाळीसगाव शहर पोलीसांत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या