Friday, May 3, 2024
Homeनंदुरबार48 हजाराची चोरी

48 हजाराची चोरी

सोमावल, Somaval ता तळोदा। वार्ताहर –

शहरात पुन्हा भरवस्तीत चोरट्यानी (Theft) खान्देशी गल्लीत एका घराचे कुलूप तोडून घरातील कपाट व त्यातील सोन्याचांदीचे दागिने (Gold and silver jewellery) व रोख रकमेवर हात साफ केला. या गल्लीतील चोरीची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे गल्लीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . परंतु या घटनेने चोरांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.

- Advertisement -

शहरातील खान्देशी गल्लीतील विनोद शरद वाघ हे आपल्या घराला कुलूप लावून तीन चार दिवसांपासून शिरपूर येथे गेले होते. तथापि, काल रात्री चोरांनी दरवाज्याला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट तोडून त्यात ठेवलेले 3 हजार किमतीचे 10 ग्राम चांदीचे जुळवे, 15 हजार किंमतीचे 5 ग्रॅम सोन्याचे कानातील झुमके,18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे तुकडे, रुपये 8 ग्रॅम चांदीचे तुकडे व रोख रक्कम रुपये 10 हजार असा एकूण 48 हजार 4ेे रुपयांचा ऐवज लंपास केला.

सकाळी उठल्यावर शेजार्‍यांना घर उघडे दिसले. त्यामुळे त्यांना शंका आल्यावर अधिक तपास केला असता चोरांनी घराचे कुलूप तोडल्याचे समजले. या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यावर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी येवून पंचनामा केला. शहरात काही महिन्यांपासून चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चोरीच्या घटना एकामागून एक घडत असतांना मात्र पोलिसांना त्यांचा छडा लावून चोरांवर वचक बसविणे अशक्य होत आहे. त्यामुळे वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांपुढे चोरांनी आव्हान उभे केले आहे. पोलिसांनी चोरांच्या बंदोबस्त करुन त्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

शहरात होत असलेल्या चोरीच्या घटनेमुळे लोकांना आता घराला कुलूप लावून बाहेरगावी जाण्याची भीती वाटत आहे. एकीकडे घराला कुलूप लावले तर कुलुप तोडून चोर डल्ला मारीत आहेत तर दुसरीकडे चोरांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे शहरातील नागरिक व त्यांची मालमत्ता सुरक्षित आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे .

मागील दहा बारा दिवसांपूर्वी चोरांनी अमरधामशेजारी असलेल्या गॅरेजमधून सामानाची चोरी केली होती. तर दीड दोन महिन्यापूर्वी खान्देशी गल्लीमधील एका शिक्षकांच्या घरीदेखील चोरी करण्यात आली होती. अश्या एकामागून एक चोरीच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या