Thursday, May 2, 2024
Homeनगरशिर्डीत उपचारासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी

शिर्डीत उपचारासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी

शिर्डी (प्रतिनिधी)

वैजापूर- शिर्डी बसने उपचारासाठी शिर्डीत आलेल्या महिलेच्या पर्समधून दागिन्यांची चोरी शिर्डी बसस्थानकात

- Advertisement -

करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुक्मिणी रघुनाथ फल्ले (वय 56) ही महिला तिच्या पतीसह वैजापूर येथून बसने उपचारासाठी शिर्डी बसस्थानकावर उतरल्या असता शिर्डी बसस्थानकावर उतरल्यानंतर पर्समध्ये असलेले दोन तोळे सोन्याची मनी मंगळसूत्र व गंठण अज्ञात चोरट्याने चोरून नेले. त्यानंतर महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डी बसस्थानकावर नेहमीच लहान-मोठ्या चोर्‍या होत असतात. अशा प्रकारच्या चोर्‍या करणार्‍या काही श्रीरामपूर शहरातील महिला असून त्यांच्यावर शिर्डी पोलिसांनी गंभीरपणे कारवाई न केल्यामुळे अशा घटना नेहमीच घडत असतात. या महिलांच्या टोळीला शिर्डी पोलिसांनी गजाआड करावे, अशी मागणी होत आहे. शिर्डी बसस्थानकावर असलेल्या सीसीटीव्हीद्वारे पोलिसांनी तपास करण्याची गरज आहे. मात्र गुन्हे शोध पथकातील पोलीस याकडे गंभीरपणे बघत नसल्याने या महिलांचे धाडस वाढत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या