Sunday, April 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: '…तर आम्ही सगळ्यांनीसुध्दा मोदींचा सत्कार नक्की केला असता'; संजय राऊतांचा...

Sanjay Raut: ‘…तर आम्ही सगळ्यांनीसुध्दा मोदींचा सत्कार नक्की केला असता’; संजय राऊतांचा मोदींना खोचक टोला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पण याचदरम्यान आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएची महत्त्वाची बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीला एनडीएच्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. कारण स्वतः मोदी या बैठकीत खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. याच बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचा सर्व खासदारांकडून सत्कार देखील करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सत्कारसमारंभावरुन मोदींना टोला लगावला आहे.

लाहोर, कराची , बलुचिस्तान वगैरे वगैरे आणि आता पीओके घेणार असे आपल्या पंतप्रधानांनी सांगितले होते. जर त्यांनी पीओके घेतला असता तर आम्हीच पंतप्रधान मोदींचा सत्कार केला असता असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चिमटा काढला. माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर प्रतिक्रिया देतानाच मोदींवर टीका ही केली.

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना एनडीएच्या बैठकीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, एनडीएची बैठक यासाठी आहे कारण राहुल गांधींनी ७ तारखेला त्यांच्या निवासस्थानीची इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. त्यासाठी सर्व नेते उपस्थित होणार आहेत. आता आमच्या बैठकीमुळे बहुतेक त्यांच्या (नरेंद्र मोदी) मनामध्ये भीती निर्माण झाली असावी आणि त्यामुळे मोदींनी आज एनडीएची बैठक बोलावली. त्यांचा हा जुना कार्यक्रम आहे. त्यामुळे आमच्या बैठकीवर परिणाम होणार नाही, असे राऊतांनी सांगितले.

त्या आजच्या बैठकीत मोदींचा सत्कार होणार आहे, असेही मला कळले, तो कशाकरता, सप्टेंबरमध्ये ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर मोदी रिटायर होत आहेत? की आणखी कशाकरिता एनडीएची लोकं त्यांचा सत्कार करणार आहेत? असा सवालही राऊतांनी विचारला.

…तर आम्ही सगळ्यांनी मोदींचा सत्कार केला असता
तसेच, खरे म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबवले नसते आणि मोदींनी वचन दिल्याप्रमाणे पीओके ताब्यात आले असते तर आम्ही सगळ्यांनीसुद्धा मोदींचा सत्कार नक्की केला असता, असे म्हणत राऊतांनी पंतप्रधान मोदींना डिवचण्याचे काम केले आहे. देशातील पंतप्रधानांनी जे सांगितले ते करून दाखवले, आता पीओक घेणार असे राजनाथ सिंग, अमित शहा, मोदी म्हणाले होते. पण आम्हाला त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली नाही याबद्दल आम्हाल दु:ख आहे अशी खोचक टीकाही राऊतांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Newasa : चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्याचा संशयास्पद मृत्यू

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून सदर चोरट्याचा मृतदेह प्रथम ग्रामीण रुग्णालय...