Friday, May 3, 2024
Homeनगरशासन व राज्यपाल असा कोणाताही संघर्ष नाही - मंत्री एकनाथ शिंदे

शासन व राज्यपाल असा कोणाताही संघर्ष नाही – मंत्री एकनाथ शिंदे

अहमदनगर|Ahmedagar

महाराष्ट्र शासन व राज्यपाल असा कोणाताही संघर्ष नाही. राज्यपाल आदरणीय व्यक्तिमत्व आहे. काल जो प्रकार घडला त्याबाबत..

- Advertisement -

मुख्यमंत्री कार्यालयाने सविस्तर स्पष्टीकरण दिले असून काही समज गैरसमज झाले असतील परंतु कुठला संघर्ष नसल्याने नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मंत्री शिंदे आज नगर दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगरमध्ये नगरविकास विभागाच्या वतीने महापालिका, नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेणार आहे. पुढे बोलताना मंत्री शिंदे म्हणाले, करोना बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काळजी घेत आहे. करोना अजून वाढू नये म्हणून सर्वांनी सुचनांचे पालन करावे. शिवजयंती उत्सवाला नियमावली केली आहे याबाबत मंत्री शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, करोना अजून गेलेला नाही. मोठ्या कार्यक्रमातून करोना फैलाव होऊ शकतो म्हणून काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या