Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील 'हे' ३० नवे चेहरे खासदार म्हणून पहिल्यांदाच संसदेत मांडणार मतदारसंघातील प्रश्न

राज्यातील ‘हे’ ३० नवे चेहरे खासदार म्हणून पहिल्यांदाच संसदेत मांडणार मतदारसंघातील प्रश्न

मुंबई | Mumbai

देशात सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) सरकार स्थापन झाले असून १८ व्या लोकसभेच्या (Loksabha) पहिल्या अधिवेशनाला आजपासून (दि.२४ जून) सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत खासदारांना (MP) खासदाकीची शपथ देण्यात आली.यावेळी सभागृहात आणि सभागृहाबाहेर अनेक घटना घडल्याचे पाहायला मिळाले.अधिवेशन (Session) सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी ससदेबाहेर हातात संविधानाच्या प्रती घेऊन घोषणाबाजी केली.तसेच आम्ही देशाची लोकशाही आणि संविधान टिकवून ठेवू असा विश्वास व्यक्त केला.यावेळी लोकसभा निवडणुकीत मातब्बर मंडळींना पराभूत करीत दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्रातील नव्या दमाच्या खासदारांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनाने दिल्ली गाजविल्याचे दिसून आले.

- Advertisement -

हे देखील वाचा : छगन भुजबळांचे जरांगेंच्या मागणीवर प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचा अभ्यास कमी, मुस्लिम समाजाला…”

या नव्या खासदारांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यासह दिगग्ज नेत्यांसोबत आंदोलन करत मोदी सरकारच्या विरोधात वज्रमूठ आवळत ‘है तयार हम’ असे दाखवून दिल्याचे पाहायला मिळाले.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) राज्यातून पहिल्यांदाच ३० नवे चेहरे प्रथमच विजयी होऊन खासदार बनून लोकसभेत गेले आहेत.

हे देखील वाचा : अठराव्या लोकसभेचे आजपासून पहिले सत्र; बुधवारी अध्यक्ष निवड

आज संसदेच्या अधिवेशनापूर्वी इंडिया आघाडीच्या नेते मंडळींनी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात महाराष्ट्रातील इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (NCP), शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार सहभागी झाले होते.राज्यातून जे ३० नवे चेहरे प्रथमच लोकसभेत गेले आहेत त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे पाच तर विरोधी पक्षाचे २४ जणांचा समावेश आहे. या राज्यातील नवनियुक्त खासदारांमध्ये काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ६, शिवसेना ठाकरे गटाचे ४ आणि एक अपक्ष खासदार आहे.

हे देखील वाचा : २८० नवे खासदार आजपासून ‘या’ फ्री सुविधांचे मानकरी

दरम्यान, राज्यातील ३० नव्या चेहऱ्यांमध्ये काँग्रेसचे (Congress) खासदार छत्रपती शाहू महाराज,बळवंत वानखेडे, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव, गोवाल पाडवी, श्यामकुमार बर्वे, कल्याण काळे, प्रशांत पडोळे, नामदेव किरसान, शिवाजी काळगे, वसंत चव्हाण हे नवे चेहरे आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके, भास्कर भगरे, बजरंग सोनवणे, धैर्यशील मोहिते पाटील,सुरेश म्हात्रे, अमर काळे हे नवे चेहरे आहेत. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे (Thackeray Shivsena) राजाभाऊ वाजे, नागेश पाटील-आष्टीकर,संजय देशमुख आणि शिंदेंच्या शिवसेनेचे (Shinde Shivsena) मंत्री संदीपान भुमरे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर हे नवे चेहरे आहेत. याशिवाय भाजपचे (BJP) मुरलीधर मोहोळ, स्मिता वाघ, हेमंत सावरा, अनुप धोत्रे तर अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील हे पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या