मुंबई | Mumbai
आज देशासह राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा (Loksabha Election) निवडणूक निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांसह उमेदवारांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. आज सकाळी आठ वाजेपासून राज्यातील विविध मतदान केंद्रांवर मतमोजणीस सुरुवात आहे. अशातच आता राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या काही उमेदवार विजयी झाले आहेत.
यात नंदुरबारमधून कॉंग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या डॉ. हीना गावित यांचा पराभव केला आहे. तसेच पालघरमधून भाजपचे हेमंत सावरा विजयी झाले असून त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारती कामडी यांचा पराभव केला आहे. तर उत्तर मध्य मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई आणि भाजपचे पियुष गोयल हे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले आहेत. याशिवाय कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज विजयी झाले आहेत.
तसेच बारामतीमधून सुप्रिया सुळे १ लाखांच्या मतांनी विजयी झाल्या आहेत. तर पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ निवडून आले आहेत. याशिवाय अमरावतीमधून कॉंग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. तर जळगावातून भाजपच्या स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय झला आहे. तसेच साताऱ्यातून उदयनराजे भोसले आणि रत्नागिरीमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे आघाडीवर असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मनाला जात आहे.
तसेच मावळमधून शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, ठाणे नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. तर वर्ध्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. तसेच चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या आहेत.