Thursday, May 2, 2024
Homeनाशिकसकारात्मक विचार करावा

सकारात्मक विचार करावा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अंगदुखी, डोकेदुखी, घशामध्ये तीव्र वेदना, ताप व सर्दी अशा प्रकारचे लक्षणे माझ्यामध्ये आढळून आले. अंडी, मासे, मटण तसेच फळभाज्या व पालेभाज्या तसेच फळांचा देखील, सुकामेवा अशा पदार्थांचा समावेश करावा जेणेकरून शरीराला मोठ्या प्रमाणावर ऊर्जा व ताकद मिळेल. कोमट पाणीदेखील मोठ्या प्रमाणात पिणे गरजेचे आहे.

- Advertisement -

याचबरोबर प्राणायाम हा योग प्रकार केला तर शरीरासाठी अधिक उत्तम. अशाप्रकारे आपण या कोविड-19 च्या काळामध्ये शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

जर मनामध्ये मी करोना पॉझिटिव्ह आहे असा विचार आला तर सकारात्मक विचार करा नक्कीच तुम्ही करोनावर मात करणार, पण त्याआधी आपल्याला करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आपणच नियमांचे पालन केले पाहिजे. घराबाहेर पडण्यापूर्वी तोंडाला मास्क असावा. गर्दीत विनाकारण जाणे टाळावे. सामाजिक अंतराचा नियम पाळावा.

मंदार परांडे , रुग्णवाहिका चालक, स्वामी समर्थ रुग्णालय नवीन नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या