नाशिक | Nashik
विधानपरिषदेच्या (VidhanParishad) मुंबई व कोकण पदवीधर आणि मुबंई व नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी सकाळी आठ वाजेपासून विविध मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरु आहे. यातील मुंबई पदवीधरमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब विजयी झाले आहेत. तर मुबंई शिक्षकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जग्गनाथ अभ्यंकर आणि कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आघाडीवर आहेत. तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून पहिल्या फेरीत महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे आघाडीवर आहेत.
हे देखील वाचा : Vidhan Parishad Elections : मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब विजयी
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teacher Constituency) निवडणुकीसाठी २१ उमेदवार रिंगणात असून नुकतीच पहिल्या फेरीची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार पहिल्या फेरीत (First Round) महायुतीचे उमेदवार किशोर दराडे आघाडीवर असून त्यांना ११ हजार १४५ मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे संदीप गुळवे यांना ७ हजार ८८ मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना ९ हजार ३७० मते पडली आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे १ हजार ७७५ मतांनी आघाडीवर आहेत.
हे देखील वाचा : Nashik Teachers Constituency Election : पहिल्या फेरीतील मतपत्रिकांची मोजणी सुरु
अपक्ष उमेदवाराने महायुती आणि महविकास आघाडीला फोडला घाम
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्यांदाच उमेदवारी करत असलेले अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच महायुती (Mahayuti) आणि महविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) घाम फोडल्याचे दिसून आले आहे. कोल्हे यांना पहिल्या फेरीत ९ हजार ३७० मते मिळाली असून त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना पिछाडीवर सोडत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यापेक्षा कोल्हे १ हजाराहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी करत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पहिल्या फेरीतच घाम फोडल्याचे दिसून आले. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीत कोल्हे यांना किती मते पडतात? हे बघणे महत्वाचे असणार आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! विधान परिषदेसाठी भाजपची पाच जणांची यादी जाहीर
मतमोजणी कक्षाबाहेर उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी कक्षाबाहेर मोठ्या प्रमाणावर उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी वाढली आहे. यावेळी गुळवे समर्थक व कोल्हे समर्थक यांच्यात घोषणाबाजीचे युद्ध जोरात सुरू आहे. ‘येऊन येऊन येणार कोण’ यासारख्या घोषणा देऊन विजय आपलाच असल्याचे ठासून सांगण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे मतदारांमध्येही उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रत्यक्षात तीनही उमेदवारांमध्ये ‘काटे की टक्कर’ सुरू असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा