Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याAgneepath Scheme वर संजय राऊत भडकले; म्हणाले...

Agneepath Scheme वर संजय राऊत भडकले; म्हणाले…

मुंबई | Mumbai

केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार ४ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटत असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

- Advertisement -

आपल्या लाडक्या बाबांना ‘फादर्स डे’निमित्त शुभेच्छा द्या!

आता यावर शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊतांनी मोदी सरकारवरती निशाणा साधला आहे. सैन्यात अग्नीपथ (Agnipath) योजनेतून ठेकेदारीवर, कंत्राटी पद्धतीने भरती केल्यास संपूर्ण सैन्यदलाची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. भारतीय सैन्यदलाचा, सुरक्षा दलाचा हा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. ठेकेदारीवरती फक्त गुलाम विकत घेतले जाऊ शकतात सैनिक नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.

‘मोदी सरकारची अशा प्रकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. मोदी सरकारने आता १० लाख, २० लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. त्याआधी त्यांनी २ कोटी, १० कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. महागाई कमी करण्यासाठी आता त्यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली.’ असंही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या