Sunday, September 15, 2024
Homeमनोरंजन"तुझा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करू"; अभिनेता किच्चा सुदीपला धमकी

“तुझा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करू”; अभिनेता किच्चा सुदीपला धमकी

मुंबई |mumbai

- Advertisement -

कन्नड अभिनेता किच्चा सुदीपबाबत (kiccha sudeep) एक बातमी समोर येत आहे . किच्चा सुदीला धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. किच्चा सुदीप आणि त्याचा मॅनेजर जॅक मंजूला धमकीचे पत्र (threating letter) मिळाले. या पत्रानंतर त्याने पुत्तनहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तुझा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करू, अशी धमकी या पत्रातून सुदीपला देण्यात आली आहे. सुदीपचा जवळचा मित्र आणि त्याचा मॅनेजर जॅक मंजूने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे…

पुढच्या महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर किच्चा सुदीप भाजपात (kiccha sudeep) प्रवेश करू शकतो अशा शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. अशातच त्याला एक धमकीचं पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. किच्चा सुदीपच्या मॅनेजरने हे पत्र स्वीकारले आहे. मात्र हे धमकीचे पत्र असेल याची त्याला कल्पना नव्हती. आता या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

जॅक मंजू हे अभिनेता किच्चा सुदीपचे निकटवर्तीय मानले जातात. धमकीचे पत्र आल्यानंतर बंगळुरूच्या पुत्तनहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४, ५०६ आणि १२० बी च्या अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. बंगळुरू शहर पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवले आहे.

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

किच्चा सुदीपच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किच्चा सुदीप त्याच्या घरातल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर भाजपात प्रवेश करायचा की फक्त त्यांचा प्रचार करायचा याचा निर्णय घेणार आहे. तर जॅक मंजू यांनी दिलेल्या माहितीनुसार किच्चा सुदीप भाजपाकडून विधानसभा निवडणुकीचं तिकीट मागू शकतो. मध्य कर्नाटकात किच्चा सुदीपचे फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणावर आहे त्याचा फायदा किच्चा सुदीपला होऊ शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

रोशनी शिंदे मारहाण प्रकरण : ठाकरे गटाचा ठाण्यात मोर्चा, पोलिसांनी दिली ‘या’ अटींसह परवानगी

कोण आहे किच्चा सुदीप?

51 वर्षीय किच्चा सुदीप आतापर्यंत राजकारणापासून दूर राहिला आहे. मात्र भाजपात प्रवेश केल्यानंतर तो केवळ राज्यातच नाही तर राज्याबाहेरही पक्षाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करणार असल्याचं म्हटलं जातंय. किच्चा सुदीपचे ‘विक्रांत रोना’ आणि ‘कब्जा’ हे चित्रपट नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘विक्रांत रोना’ या त्याच्या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला.

किच्चा सुदीपचा काल्पनिक अ‍ॅक्शन चित्रपट विक्रांत रोना या चित्रपटाची कथा ही एका रहस्यमय घटनेभोवती फिरणारी आहे, ज्यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणारा किच्चा सुदीप हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. थ्रीडी फॉरमॅटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कलेक्शनचा शानदार आकडा पार करून प्रेक्षकांना थिएटर्सच्या खुर्चीला खिळवून ठेवलं होतं. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 33 ते 35 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर रिलीजच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा गाठला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या