Friday, October 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशकातील भाजप पदाधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी

नाशकातील भाजप पदाधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

- Advertisement -

नाशकातील भाजप पदाधिकारी शरद फडोळ यांना फोनवरून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप पदाधिकारी शरद फडोळ हे गुरुवारी (दि. ९) घरी असतांना रात्री सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान त्यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गोळीबार करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फडोळ यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची भेट घेत झालेला प्रकार कथन केला.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार सोमनाथ गुंड करत आहेत. फडोळ यांना धमकी देणारा व्यक्ती कोण आहे व त्याने कुणाच्या सांगण्यावरून धमकी दिली याचा तपास पोलीस करीत आहेत.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशकात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारांची धरपकड मोहीम सुरु आहे. नागरिकांनी आयुक्तांच्या या निर्णयाचे स्वागत होतांना दिसून येत आहे. एकीकडे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सुरु असतांना फोनद्वारे राजकीय पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताने एक प्रकारे पोलिसांना आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

कर्ज

अनेक बँकांत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

0
मुंबई | Mumbaiराज्यातील एकापेक्षा अधिक बँकांमध्ये पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर...