Tuesday, November 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअनेक बँकांत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

अनेक बँकांत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | Mumbai
राज्यातील एकापेक्षा अधिक बँकांमध्ये पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ मध्ये एका शेतकऱ्याची विविध बँकांमधील पात्र पीककर्जाची थकबाकी एकत्रितपणे विचारात घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही योजनेच्या निकषांनुसार कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे, कर्जमाफीसाठी केवळ एका बँकेतील कर्जाचा विचार न करता एक किंवा अनेक बँकांमधील पात्र कर्जखात्यांची एकत्रित थकबाकी विचारात घेतली जाणार आहे. त्यामुळे दोन किंवा अधिक बँकांमध्ये पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही तरतूद महत्त्वाची ठरणार आहे.

- Advertisement -

भारत-चीन LAC वर तणाव; ; चिनी सैन्याकडून कुरघोड्या सुरुच, भारतीय जवानांचं जशास तसे उत्तर, ITBP DG यांचा खुलासा

नेमका निर्णय काय?
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेनुसार, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीककर्जाची ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकी असणे आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत त्याची परतफेड झालेली नसणे आवश्यक आहे. अशा पात्र शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकांमधील कर्जखात्यांची मुद्दल आणि व्याजासह एकत्रित थकबाकी दोन लाख रुपयांपर्यंत असल्यास, योजनेच्या इतर अटींच्या अधीन राहून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. यामध्ये जमीनधारणेच्या क्षेत्राचा निकष लागू नसल्याचे शासनाच्या योजनेत नमूद आहे. मात्र, कर्जाचा प्रकार, कर्ज घेतल्याचा कालावधी, थकबाकीची स्थिती आणि इतर पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

1 लाख 15 हजार 697 पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती आणि 2 लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

किती रक्कम जमा
आतापर्यंत 15.85 लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर 13 हजार 275 कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 16 लाख 96 हजार 201, दुसऱ्या यादीत 4 लाख 19 हजार 737 आणि तिसऱ्या यादीत 3 लाख 51 हजार 192 अशा एकूण 24 लाख 67 हजार 130 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आता एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि 2 लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या 1 लाख 15 हजार 697 पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

Crime News : डॉक्टरांचे क्लिनिक फोडून ऐवज लांबविला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील बाळासाहेब देशपांडे रूग्णालयासमोरील मदनचंद्र आर्केड इमारतीतील डॉ. अविनाश किनगांवकर यांच्या आय क्लिनिकमध्ये घरफोडी करून चोरट्याने सुमारे 22 हजार 900 रूपयांचा ऐवज...