Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Rain News : पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागांत तीन आपत्तीजनक घटना

Nashik Rain News : पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागांत तीन आपत्तीजनक घटना

एका घटनेत महिलेचा मृत्यू

नाशिक | Nashik

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागांत (Rural Area) मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहतांना पाहायला मिळत आहे. तर अनेक भागांत मंदिरे, पुल, रस्ते आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या असून अनेक गांवाचा संपर्क तुटला आहे. अशातच आता या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील (District) विविध भागांत तीन आपत्तीजनक घटना (Catastrophic Incidents) घडल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले

यातील पहिली घटना इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) मौजे कानडवाडीत (Kandwadi) घडली आहे. येथील भीमा काळू पडवळे यांच्या राहत्या घराची भिंत पहाटेच्या सुमारास पडली असून यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर प्रशासनाकडून पंचनामाची तजवीज ठेवून प्राथमिक अहवाल सादर केला जाणार आहे.

हे देखील वाचा : मुसळधार पावसामुळे चांदोरीतील प्रसिद्ध खंडेराव मंदिर पाण्याखाली

तर दुसरी घटना शनिवार (दि.०३) रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास सुरगाणा तालुक्यात (Surgana Taluka) घडली आहे. सुरगाणा तालुक्यातील मौजे.चिचंदा (गहाले) येथील मंगला अमृत बागुल या नदी पार करत असताना अचानक नदीला आलेल्या जोराच्या पुरामुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. त्यानंतर आज सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह (Dead Body) नदीकाठी आढळून आला आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज

तसेच तिसरी घटना इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते (Kaluste) येथे घडली आहे. येथील भाम धरणातून (Bham Dam) शनिवार (दि.०३) रोजी सोडलेल्या अतिरिक्त विसर्गामुळे नाल्याचे व नदीचे पाणी मौजे. काळूस्ते येथील घरांमध्ये शिरले होते. त्यानंतर प्रशासनाने पाच ते सहा कुटुंबे व अंदाजे २० ते २२ लोकांना (People) सुरक्षितस्थळी हलविले आहे. तर संभाव्य धोका लक्षात घेता प्रवाहामध्ये येणाऱ्या गांवाना प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या