चांदवड | वार्ताहर Chandwad
चांदवड नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दहा ते बारा दिवस लोटलेत मात्र राजकीय डावपेच काही थांबायला तयार नाहीत त्यांचाच अनुभव आला तो आज शुक्रवार दि २ जानेवारीला. ठाणे येथे शिवसेना सचिव व उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चांदवड नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवक व दोन अपक्ष अशा तीन नगरसेवकांनी तसेच राजकीय व सामाजिक कार्येकर्त्यानी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.या प्रवेशाने शिवसेना पक्षांची चांदवड तालुक्यात नक्कीच ताकद वाढली आहे.
या प्रवेश सोहळ्यास युवासेनेचे अभिषेक चौधरी,नाशिक उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे, जिल्हा संघटक तथा नगरसेवक संदीप उगले, तालुका प्रमुख निलेश ढगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान चांदवड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग १ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षांकडून निवडणूक लढवून निवडून आलेले सुधीर कबाडे हे पक्षाचे एकमेव विजयी उमेदवार राष्ट्रवादीला सोडून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे तर प्रभाग दोन मधून अपक्ष निवडणूक लढवीत विजयी होणारे राजू बागवान यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला तर प्रभाग ९ मधून भाजप उमेदवाराचा पराभव करून निवडून आलेले अपक्ष उमेदवार प्रमोद बनकर यांनी देखील शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. चांदवड नगरपरिषदेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक आलेले दोन नगरसेवक व आज तीन नगरसेवकांनी प्रवेश केल्याने शिवसेनेची चांदवड नगरपरिषदेत ५ नगरसेवक झाले आहेत.शिवसेनेचे पारडे जड झाले आहेत.
या सोबतच नांदूरटेकचे सरपंच तथा खरेदी विक्री संघाचे मा. संचालक भाजपचे माजी पदाधिकारी प्रभाकर ठाकरे,आरपीआय आठवले गटांचे उपजिल्हा अध्यक्ष तथा चांदवड नगरपरिषदेत थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे राजाभाऊ आहिरे,भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत ठाकरे,जितेंद्र (देवा) पाटिल,समाधान आवारे,दीपक पवार,संदीप पवार,किरण काळे, सागर काळे,मनोज कुंभार्डे, रविराज अहिरे,मयूर बोरस्ते,रिजवान बागवान,नावेद बागवान,सोनू बागवान,शाहरुख तांबोळी या प्रमुख लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यांच्या प्रवेशाने चांदवड तालुक्यातील राजकीय गणिते बदलणार आहेत.आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध शिवसेना सामना बघावयास मिळणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरीचा मास्टर स्ट्रोक…
चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील भूमिपुत्र असलेले भाऊसाहेब चौधरी यांनी शिवसेनेत संघटन बळकटीकरणास नेहमीच प्राधान्य दिले आहे.त्यांचीच प्रचीती म्हणून नगरपरिषदेत शिवसेना नगरसेवकांची संख्या ५ झाली आहे.आज भाजपा नंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना ठरला आहे.आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी चांदवडच्या राजकीय पटलावर भाऊसाहेब चौधरी अजून कित्ती धक्के देणार हे येणारा काळात दिसलेच मात्र श्री चौधरी यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजपाला मास्टरस्टोक दिला आहे.
” सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराची भूमिका घेऊन काम करणाऱ्या शिवसेनेवर नागरिकांचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून केलेला हा प्रवेश म्हणजे शिवसेनेच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास व भरोशाची स्पष्ट साक्ष आहे. या प्रवेशामुळे चांदवड शहर व तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असून येणाऱ्या काळात जनहिताचे निर्णय अधिक प्रभावीपणे राबवले जातील. शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहिली असून, पुढील काळातही विकास व लोककल्याणाच्या दृष्टीने भक्कम कार्य केले जाईल.“
भाऊसाहेब चौधरी,सचिव शिवसेना.




