पुणे | Pune
येथील औंध परिसरात (Aundh area) एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह (Dead Body) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आत्महत्या (Suicide) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे…
उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुदिप्तो गांगुली (वय ४४) असे आत्महत्या केलेल्या पतीचे (Husband) नाव असून ते पुण्यातील (Pune)एका कंपनीत नोकरीला असल्याचे समजते. तर सुदिप्तो यांनी पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलाची अगोदर हत्या (Murder) केली. धक्कादायक बाब म्हणजे सुदिप्तो यांनी पत्नी आणि मुलाच्या चेहऱ्याला प्लास्टिक पिशवी गुंडाळून हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.
राज्यपालांच्या ‘त्या’ भूमिकेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
दरम्यान, सुदिप्तो यांच्या पत्नीच्या भावाने अनेकदा घरी फोन केले. मात्र कुणीही फोन उचलला नाही. त्यानंतर संशय आल्याने त्याने मित्रांच्या माध्यमातून चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात (Chathushringi Police Station) बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. तसेच सुदिप्तो यांनी नेमकी हत्या आणि आत्महत्या कशामुळे केली? याचा अधिक तपास पोलिस (Police) करत आहेत.