Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Accident News : ट्रक-मोटारसायकल अपघातात तिघांचा मृत्यू; एक गंभीर

Nashik Accident News : ट्रक-मोटारसायकल अपघातात तिघांचा मृत्यू; एक गंभीर

पेठ | वार्ताहर | Peth

येथील नाशिक-पेठ मार्गावरील (Nashik-Peth Highway) पेठ शहरानजिकच्या शिवमल्हार ढाब्याजवळ ट्रक आणि मोटरसायकल (Trucks and Motorcycles) यांच्यात झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Rain News : नाशकात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची ‘जोर’धार; नागरिकांची तारांबळ

YouTube video player

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक क्रमांक (एमएच २८ बीबी ०१०७) या वाहनास पेठकडून करंजाळीकडे जाणाऱ्या मोटरसायकलवरील लहू सुदान लिलके (वय १६) रा . कोचरगाव ता . दिंडोरी हे आपले नातेवाईक कमलाकर नामदेव पानडगळे (वय २५) , योगेश अरुण पानडगळे (वय १९) , सागर शंकर पानडगळे सर्व (रा. भायगाव, ता.पेठ) यांच्या वाहनाची रात्री ११ वाजेदरम्यान धडक झाली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पेठ पोलिसांनी वाहनासह पकडला लाखोंचा गुटखा

यात लहू लिलके, कमलाकर पानडगळे, योगेश पानडगळे यांचा जागीच मृत्यु झाला.तर सागर पानडगळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सुदाम लिलके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रभारी पोलीस अधिकारी दुरगुडे, पोलीस हवालदार डी.आर. पानडगळे यांनी ट्रक चालक मोहम्मद गौस अब्दूल जबरसाठ रा.अरनली, जि. बेल्लारी, कर्नाटक याच्या विरोधात अपघाताच्या (Accident) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...