Friday, November 22, 2024
HomeनाशिकLoksabha Election 2024 : नाशिकमधील ३ तर दिंडोरीतून ५ उमेदवार निवडणूक रिंगणातून...

Loksabha Election 2024 : नाशिकमधील ३ तर दिंडोरीतून ५ उमेदवार निवडणूक रिंगणातून बाद

गोडसे व भगरे यांच्या उमेदवारी अर्जावरील हरकती फेटाळल्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) दाखल केलेल्या उमेदवार अर्जांची आज छाननी करण्यात आली. यामध्ये नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) व दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare)यांच्या उमेदवारी अर्जावर उपस्थित करण्यात आलेल्या हरकती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी फेटाळल्या आहेत. त्यानंतर झालेल्या छाननीमध्ये नाशिकमधील ३ उमेदवार तर दिंडोरीतून ५ उमेदवार निवडणूक रिंगणातून बाद झाले आहेत.

- Advertisement -

यानंतर छाननी झाल्यावर नाशिक लोकसभेच्या (Nashik Loksabha) निवडणूकीसाठी ३६ तर दिंडोरी लोकसभेच्या (Dindori Loksabha) निवडणूकीसाठी १५ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता सोमवार (दि.६) रोजी माघारीनंतर निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी ३९ उमेदवारांनी ५६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी शनिवारच्या छाननीत ६ उमेदवारांचे अर्ज रद्द ठरविण्यात आले आहेत. त्यानंतर उमेदवारांच्या अतिरिक्त अर्जांचे समायोजन केल्यानंतर निवडणूक रिंगणामध्ये ३६ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत.

हे देखील वाचा : ठाकरे गटाने उमेदवारी नाकारलेले विजय करंजकर आहेत ‘एवढ्या’ कोटींचे मालक

यात बाद झालेल्या उमेदवारी अर्जांत प्रामुख्याने शांतिगीरी महाराजांचा शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवारीचा एक अर्ज, निवृत्ती अरिंगळे यांचा एबी फॉर्म नसल्याने एक अर्ज बाद झाला आहे. भक्ती गोडसे यांचा एबी फॉर्म अभावी उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. तर अनिल जाधव यांचा एक अर्ज भाजपाचा एबी फॉर्म नसल्याने बाद करण्यात आला. याशिवाय जयदेव मोरे यांची सुचना अपुरी असल्याने तर भिमराव पांडवे यांचा मतदार यादीतील नावाची नोंद न दिल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला.

दिंडोरीत ३ उमेदवारांची माघार

दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २० उमेदवारांनी २९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज (दि.४) रोजी ५ उमेदवारांचे अर्ज रद्द बातल करण्यात आले आहेत. त्यानंतर उमेदवारांच्या अतिरिक्त अर्जांचे समायोजन केल्यानंतर निवडणूक रिंगणामध्ये १५ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. बाद झालेल्या उमेदवारी अर्जांमध्ये प्रामुख्याने काशिनाथ सीताराम वटाणे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन) या पक्षाला अधिकृत मान्यता प्राप्त नसल्याने व अपक्षासांठीच्या सुचकांची संख्या पर्याप्त नसल्याने उमेदवारी बाद करण्यात आला. तर खान गाजी इकबाल अहमद यांनी (अपक्ष) यांच्या नावात व जातीच्या प्रमाणपत्राच्या नावात फरक असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. तसेच संजय चव्हाण यांनी जातीचा दाखला जोडलेला नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. तर पल्लवी भगरे यांचा राकाँचा एबी फॉर्म नसल्याने व सुभाष चौधरी यांचा माकपाचा एबी फॉर्म नसल्याने दोनही अर्ज बाद ठरवण्यात आले. यानंतर आता निवडणूक रिंगणात १५ उमेदवार राहिले असून, माघारी नंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघातील वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद

गोडसेंवरील हरकत फेटाळली

हेमंत गोडसे यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांच्यावरील गुन्हांची माहीती तपशिलात सादर केलेली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते. त्यावर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी प्रतिज्ञापत्रात उमेदवाराने माहीती खरी असल्याचे नोंदवलेले आहे. त्याबाबत काही तक्रार असल्यास न्यायालयात दाद मागण्याची तरतूद असल्याने त्याचा अवलंब करण्याची सुचना केली.

भगरेंवरची हरकत फेटाळली

भास्कर भगरे यांच्या उमेदवारी अर्जात जमीन खरेदी केल्याची किंमत टाकलेली नसून त्याजागी निरंक लिहीलेले असल्याची हरकत एका वकीलाने नोंदवली. मात्र तो कोणत्याच उमेदवाराचा प्राधिकृत प्रतिनिधी नसल्याने निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांची हरकत फेटाळून लावली. व ते प्राधिकृत प्रतिनिधी नसल्याने बैठकीला बेकायदेशिररित्या उपस्थित राहील्याने वकिलांनाच सभागृहाच्या बाहेर जाण्याचे निर्देश दिले.

हे देखील वाचा : नाशिक महापालिकेच्या हद्दीत ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

छाननीला निरिक्षकांची उपस्थिती

नाशिक लोकसभा व दिंडोरी लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेतील पारदर्शकता तपासण्यासांठी निवडणूक आयोगाने पाठंवलेल्या निरिक्षकांनी पूर्णवेळ हजेरी लावत प्रक्रियेचे काळजीपूर्वक निरिक्षण केले. या दरम्यान उमेदवारी अर्ज बाद करताना त्याबाबतचा सविस्तर खुलासा निरिक्षकानी घेतला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या