धुळे । dhule । प्रतिनिधी
येथील वलवाडी शिवारातील सुशिनाल्याजवळ असलेल्या अमरधामजवळ गांजा बाळगणार्या(possessing ganja)तिघांना पश्चिम देवपूर पोलिसांनी काल मध्यरात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गांजासह 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी (police custody) देण्यात आली.
पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे निरिक्षक नितीन देशमुख यांच्यासह पथकाने रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास वलवाडी शिवारातील सुशिनाल्याजवळील अमरधामजवळ छापा टाकला. तेथून राहुल सुरेश मोहिते (वय 26 रा.दैठणकर नगर, देवपूर), भटु रंगनाथ ठाकरे (वय 23), व संतोष शिवदास मोरे (वय 38) दोघे रा.वलवाडी, देवपूर आणि बापु ठाकरे (रा.इंदिरा नगर, देवपूर) हे चौघे विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगतांना मिळून आले. या कारवाई दरम्यान अंधाराचा फायदा घेत बापु ठाकरे हा पसार झाला.
तर तिघांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 9 हजार 600 रूपये किंमतीचा गांजा, 50 हजार रूपये किंमतीचे चार मोबाईल व 1 हजार 60 रूपयांची रोकड असा एकूण 60 हजार 660 रूपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोहेकॉ.पुरूषोत्तम सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार वरील चौघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख हे करीत आहेत.