Friday, June 20, 2025
Homeनगरशनीशिंगणापूर परिसरात वादळी वार्‍यासह गाराचा पाऊस

शनीशिंगणापूर परिसरात वादळी वार्‍यासह गाराचा पाऊस

शनिशिंगणापूर |वार्ताहर|Shani Shingnapur

नेवासा तालुक्यातील (Newasa) शनिशिंगणापूर परिसरात आज (सोमवार) वादळी वार्‍यासह (Stormy Winds) गाराचा तडाखा बसला. वारा जोराचा असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली होती.

- Advertisement -

शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) परिसरातील कांगोनी, पानसवाडी, बेल्हेकरवाडी, शिरेगाव, हिंगोणी आदी भागात सायंकाळी साडेचारच्या सुमारास वादळी वार्‍यासह गारासह पाऊस (Hail Rain) झाला. सुमारे अर्धा तास अवकाळी पावसाने हजरी लावली. यामुळे अनेकांचे पत्रे, शेडनेट उडाल्याने नुकसान झाले.

राहुरी रोड, जुना वांबोरी रोड यासह काही भागात वादळी वार्‍यामुळे झाडे पडली तर वीजेचे खांब मोडून पडले. परिणामी वीजपुरवठा खंडीत झाला होता. उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या अवकाळ्या पावसाने थोडाफार गारव्याचा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरात जोरदार पाऊस; वाकी, पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण परिसरात गत तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल...