Sunday, May 19, 2024
Homeनगरमळणी यंत्राची चोरी; 4 आरोपी जेरबंद

मळणी यंत्राची चोरी; 4 आरोपी जेरबंद

राहाता |वार्ताहर| Rahata

शेती अवजारे विक्री दुकानात कामास असलेल्या आरोपीने साथीदारांना बरोबर घेत मळणी यंत्र चोरी केले. ते विक्री करण्याचा डाव आखण्यापूर्वीच 24 तासात पोलिसांनी 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेला व चोरीसाठी वापरलेल्या असा एकूण 10 लाख 70 हजारांचा मुद्दामाल जप्त केला. या गुन्ह्यातील सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली होती.

- Advertisement -

हाफ मर्डरवाले दोघे पकडले

श्री साई इनपुट या शेती मशिनरी दुकानासमोरील मळणी यंत्र ट्रॅक्टरला जोडुन चोरुन नेले. बाबतची फिर्याद दुकान मालक विशाल वाळेकर यांनी राहाता पोलीसात दिली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपीं विरोधात भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये पथक तयार करून घटस्थळाची बारकाईने पाहणी करुन मालाचे वर्णन तसेच इतर परिस्थीजन्य पुराव्याचे आधारे तांत्रिक विश्लेषण करुन व गोपनिय बातमीदाराच्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी सोमनाथ किसन कुदळे, साकुरी, विजय इंद्रभान घोगळ, पिंपळस, रेवनन्नाथ वसंत डांगे, कोर्‍हाळे व लहू सोमनाथ वायकर, पिंपळवाडी असे एकूण चार आरोपींना राहाता पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर तात्काळ अटक केली.

आव्हाडांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – हजारे

आरोपींंकडुन चोरीस गेलेले भुर कंपनिचे मळणी यंत्र, तसेच चोरी करताना वापरण्यात आलेला सामे कंपनिचा ट्रॅक्टर, मँगो कंपनीची मालवाहतूक रिक्षा, होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल, हिरोहोंडा कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल असा एकूण 10 लाख 70 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

लोणीत भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा

या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांचे निर्देशानुसार शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचे मार्गदर्शानाखाली राहाता पोलीस स्टेशनचे पोसई अरविंद गुंजाळ, स. फौ. बाबासाहेब सांगळे, पो.हे.कॉ. प्रभाकर शिरसाठ, सुधाकर काळोखे, अशोक झिने, रामेश्वर इंगळे, नवनाथ अनारसे, पो.ना. कल्याण काळे, गणेश गडाख, पो.कॉ. अमोल नागले, विलास मोरे यांनी केली आहे.

वडिलांचा खून करून पुरावा नष्ट करणार्‍या नराधम मुलास जन्मठेप

साकुरी महामार्ग लगत कृषी अवजारांचे मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. अनेक व्यावसायिकांनी दुकानासमोर मोठमोठे अवजारे दुकानासमोर विक्रीसाठी ठेवले आहेत. पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालतात परंतु शेती अवजारे मोठी असल्याने पोलीस गाडीच्या भोंग्याचा आवाज ऐकल्यानंतर चोरी करणारे व्यक्ती शेती अवजारा फायदा घेऊन जाऊन लपतात. शेती या व्यवसायिकांनी रात्रीच्या वेळी या ठिकाणी वॉचमनची नेमणूक करावी तसेच दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे व औजारे सुरक्षित राहण्याकरिता बाहेरून जाळी किंवा इतर वेगवेगळे उपाय करणे गरजेचे आहे.

– कैलास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या