Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यापोलिसांचे प्रयत्न फळास!

पोलिसांचे प्रयत्न फळास!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक ग्रामीणसह अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांचा शोध घेऊन सर्वाधिक 181 गुन्हे नाशिक ग्रामीणमध्ये दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

परीक्षेत्रातील 199 शेतकर्‍यांना 6 कोटी 75 लाख 88 हजार रुपये इतकी रक्कम परत करण्यात आली आहे. उर्वरित 5 कोटी 84 लाख 45 हजार 610 रुपयांची रक्कम देण्यास व्यापार्‍यांनी तयारी दर्शविल्याची माहिती नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली.

शेतकरी फसवणुकीबाबत तीन महिन्यांत सुमारे 1 हजार 192 तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचा पाठपुरावा करत 191 व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आणि उर्वरित 200 व्यापार्‍यांशी तडजोड करून पोलिसांनी 199 व्यापार्‍यांना सुमारे सहा कोटी 75 लाख 88 हजार 100 रुपयांची रक्कम परत करण्यास यश आल्याचे दिघावकर म्हणाले.

नाशिकच्या शेतकर्‍यांना मिळाली रक्कम

नाशिक ग्रामीणमधील 181 व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर 183 व्यापार्‍यांकडून आपआपसांत तडजोड करत नाशिकच्या सुमारे 177 शेतकर्‍यांना आतापर्यंत 5 कोटी 55 लाख 18 हजार 539 रुपये प्रत्यक्षपणे मिळाले आहेत, अशी माहिती डॉ. दिघावकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या