Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रचिंताजनक : राज्यात आज ‘इतके’ करोना बळी

चिंताजनक : राज्यात आज ‘इतके’ करोना बळी

मुंबई –

महाराष्ट्रात आज दिवसभरात राज्यात 166 करोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर 35 हजार 726 नवे करोना पॉझिटिव्ह

- Advertisement -

रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.2 टक्के इतका आहे. राज्यात सध्या एकूण 3,03,475 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज 14 हजार 523 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, राज्यात आतापर्यंत एकूण 23 लाख 14 हजार 579 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 86.58 टक्के एवढे झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1,91,92,750 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 26,73,461 (13.93 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14,88,701 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 15,644 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या